Vijai Sardesai : मोठ्या आवाजात अधिक पैसा; संगीत पार्टी मुद्यावरुन आमदार सरदेसाई यांचा गोवा सरकारवर निशाणा

स्थानिकांना नियमावली शीथिल करण्य
Goa Forward Party | Vijay Sardesai
Goa Forward Party | Vijay SardesaiDainik gomantak

गोव्यातील किनाऱ्यावर रात्री 10 नंतर सुरु असलेल्या संगीत पार्टीच्या मुद्यावरुन आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा सरकारला फटकारले आहे. गोवा सरकारने पार्टी आयोजकांशी संगनमत करुन स्थानिकांना वेटीस धरले आहे. तसेच मोठ्या आवाजासाठी अधिक पैसा देखील सरकारला पुरवला जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.

(MLA Vijai Sardesai has criticized the Goa government saying big money in loud music)

Goa Forward Party | Vijay Sardesai
Goa Dance Bar: कळंगुटमधील पंचायतीने बेकायदा व्यवसायांवर थेट कारवाई करत 3 डान्स बार केले बंद

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यातील मोठ्या आवाजात आयोजित केल्या जाणाऱ्या संगीत पार्ट्यांवरुन सरकारला फटकारले आहे. सरदेसाई म्हणाले की, या पार्ट्यांसाठी पैसे पुरवणाऱ्या हॉटेल व्यावसाईकांना जाणिवपुर्वक बगल दिली जात आहे. तसेच किनारी पट्ट्यातील स्थानिकांच्या कार्यक्रमावर निर्बंध कमी करावेत असे ही सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Goa Forward Party | Vijay Sardesai
INS Mormugao: आत्मनिर्भर भारताचं आणखी एक पाऊल! नौदलात INS मोरमुगाओ दाखल

यावेळी सरदेसाई म्हणाले की, मोठ्या आवाजातील संगीत पार्ट्यांमध्ये अधिक पैसे आहेत, त्यामुळे गोवा सरकारकडून पार्टी आयोजकांना बगल देत स्थानिकांना नियमावलीत अडकवले जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी यावेळी केला आहे. स्थानिक नागरीकांना व्यक्तिगत कार्यक्रम, विवाह, यात्रा, जत्रा, फेस्त यांचा विचार करत आवाजातील निर्बंधावरुन सरकारवने नियमावली बदलली असली तरी या जाचातून सुटका झाली नसल्याचे म्हणत सरदेसाई यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

नव्या आदेशाने हॉटेल मालकांत नाराजी

पर्यटनाच्या नावाखाली किनारी भागात होत असलेल्या ध्वनिप्रदूषणावर बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावरुन जगप्रसिद्ध कळंगुट-बागा तसेच हणजुण -वागातोर समुद्र किनाऱ्यावर कडक अंमलबजावणी होत आहे. यामुळे हॉटेल मालकांत नाराजीचा सुर आहे. ''हे आदेश म्हणजे सरकारचा खाण व्यवसायाप्रमाणे पर्यटन व्यवसाय संपवण्याचा डाव असल्याचे हॉटेल मालकांनी म्हटले आहे''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com