Vijai Sardesai: नदीत बुडणाऱ्या तिघांचे जीव वाचवणाऱ्या अंकुरकुमार प्रसाद याला मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार द्या

आमदार विजय सरदेसाई यांची मागणी; विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव
Vijai Sardesai | AnkurKumar Prasad
Vijai Sardesai | AnkurKumar Prasad Dainik Gomantak

Vijai Sardesai: कुंभारजुवे येथे नदीत बुडणाऱ्या तिघा मुलांना वाचवणाऱ्या अंकुरकुमार प्रसाद याला मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार देऊन गौरवावे, अशी मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. अंकुरकुमार याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आमदार सरदेसाई विधानसभेत मांडणार आहेत.

Vijai Sardesai | AnkurKumar Prasad
Panaji City: पावसाळ्यात राजधानी पणजीत उद्भवणार समस्या; महापौरांनीच व्यक्त केली चिंता

अंकुरकुमार हा चौथीत शिकणारा विद्यार्थी आहे. त्याचे वय दहा वर्षे इतके आहे. या वयात त्याने दाखवलेले शौर्य कौतूकास्पद आहे. पोहण्याची थोडी जाण असतानाही त्याने तिघा विद्यार्थ्यांचा जीव वाचवला. त्यामुळे त्याला मुख्यमंत्री शौर्य पुरस्काराने गौरवावे, असे आमदार सरदेसाई यांनी म्हटले आहे.

अंकुरप्रसाद संजय प्रसाद हा कुंभारजुवे सरकारी प्राथमिक विद्यालयात चौथीत शिकतो. शनिवार 25 मार्च रोजी दुपारी 3: 30 च्या सुमारास श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण पालखी सुरू होती.

पालखी उत्सवात लोक गुलाल अर्पण करतात आणि देवीचा आशीर्वाद म्हणून पुजारींकडून गुलाल घेतात. एका मुलाच्या डोळ्यात गुलाल गेला म्हणून त्याने जवळच असलेल्या नदीत डोळे धुवायचे ठरवले.

Vijai Sardesai | AnkurKumar Prasad
Banda check post : गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीस बसणार चाप; उद्यापासून सुरू होणार बांदा सीमा तपासणी नाका

विजयकुमार, आर्यन आणि मुकेश हे नदीत उतरले, पण पाय घसरून पाण्यात पडले आणि पोहता येत नसल्याने बुडू लागले. अंकुरकुमार जवळच सायकल चालवत होता. त्याने त्यांना बुडताना पाहिले.

त्याला थोडे पोहणे माहीत असल्याने त्याने नदीत उडी मारून महत्प्रयासाने बुडणाऱ्यांना बाहेर काढले. विजयकुमार पूर्णपणे फुगलेला असल्याने अंकुरकुमारने छाती आणि पोट दाबून विजयकुमारच्या पोटातील पाणी काढले.

अंकुरकुमार संजय प्रसाद (10 वर्षे) याचे कुटूंब मुळचे बिहारचे असून तो कुंभारजुवे येथे आई, वडील आणि बहिणीसोबत राहतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com