आमदार विनोद पालयेकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

विनोद पालयेकर यांनी येत्या एक-दोन दिवसांत भाजपची पायरी चढण्याचे जवळपास निश्चित केल्याची जोरदार चर्चा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
BJP

BJP

Dainik Gomantak 

शिवोली: भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पर्वरीचे माजी आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) तसेच साळगावचे माजी आमदार जयेश साळगावकर यांना येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची पक्की हमी दिल्याने या गोष्टीवरून स्फुरण चढलेले शिवोलीचे विद्यमान आमदार विनोद पालयेकर (Vinoda Paliencar) यांनी येत्या एक-दोन दिवसांत भाजपची पायरी चढण्याचे जवळपास निश्चित केल्याची जोरदार चर्चा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
सुकूर पंचायत माजी आमदार रोहन खंवटेंच्या दबावाखाली; रितेश चोडणकरांचा आरोप

भाजपचे (BJP) निष्ठावान नेते दयानंद मांद्रेकर यांना डावलून पालयेकर यांना विधानसभेसाठी भाजपचे तिकीट दिल्यास पक्षात मोठी बंडाळी माजण्याची शक्यता असून अनेकांनी अशा परिस्थितीत दिलायला लोबो यांंना उघडपणे पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याचे सूत्रांकडून समजते.

मायकलच्या पवित्र्याकडे सर्वांचे लक्ष

कळंगुटचे आमदार तथा भाजप सरकारमधील विद्यमान आमदार तथा मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी ‘पत्नीसाठी वाट्टेल ते’ असा सूर आळवताना शिवोलीच्या कानाकोपऱ्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाजप पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होण्याआधीच ते वेगळी चूल मांडतील, यात शंका नाही.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
ख्रिस्ती बांधवाकडून नव वर्षाचे उत्साहात स्वागत

शिवोलीत लोबोंना प्रतिस्पर्धी नाही

स्वसामर्थ्यावर नवीन आमदार निवडून आणण्याची क्षमता असलेले मंत्री लोबो यांच्यासाठी शिवोलीत (Siolim) सध्या तरी तसा प्रतिस्पर्धी दिसून येत नाही. त्यामुळे दिलायलांचा विजय निश्‍चित असल्याचे दीपक धारगळकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com