मॉडेल पूनम पांडेने गोवा पोलिसांकडे केली तक्रार, सॅम अहमदला अटक

प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

काणकोण येथे अभिनेत्री पूनम पांडे हिला मारहाण केल्याप्रकरणी तिचा पती व चित्रपट दिग्दर्शक सॅम अहमद (४६ वर्षे, बांद्रा-मुंबई) याला पोलिसांनी आज अटक केली.

काणकोण:  काणकोण येथे अभिनेत्री पूनम पांडे हिला मारहाण केल्याप्रकरणी तिचा पती व चित्रपट दिग्दर्शक सॅम अहमद (४६ वर्षे, बांद्रा-मुंबई) याला पोलिसांनी आज अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काणकोणमध्ये मंगळवारी एका तारांकीत हॉटेलात सॅम अहमद व मॉडेल व अभिनेत्री पूनम शोभनाथ पांडे (२९ वर्षे) उतरले होते. चित्रिकरणाच्या निमित्ताने ती १६ सप्टेंबरपासून हॉटेलात आहे. 

पावसामुळे चित्रीकरण करता येत नसल्याने दोघेही हॉटेलातच होते. सोमवारी (ता.२१) दुपारी ३ वा. दोघांत वादावादी झाली. अहमदने पूनमला थप्पड मारून धक्कबुक्की केली व अश्‍लिल शिव्या दिल्या, जीवे मारण्याची धमकी देऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे पूनम हिने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. याची दखल घेऊन पोलिसांनी अहमदला ताब्यात घेऊन नंतर अटक केली.

संबंधित बातम्या