Baby kidnapping case: ‘बाळा’बाबत मी अंधारातच; संशयित महिला विश्रांतीच्या पतीची कबुली

Justice.jpg
Justice.jpg

पणजी: बांबोळी येथील गोमेकॉ (GMC) इस्पितळ परिसरातून बाळ अपहरण प्रकरणातील (Baby kidnapping case) संशयित विश्रांती हिचा पती मोहन गावस याची मंगळवारी पणजी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कबुली जबाब (कलम-164) नोंदविण्यात आला. याप्रकरणी आपणास कोणतीच कल्पना नसल्याचे व पूर्णपणे अंधारात ठेवल्याचे त्याने जबानीत म्हटले आहे. (Mohandas Gavas admitted that he had no information about the baby)

बाळ अपहरण प्रकरणाशी मोहन गावस याचा काहीच संबंध नसल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. पत्नीने गरोदरपणाचा तसेच प्रसूती होऊन मुलगा झाल्याचा बनाव केल्याची माहिती बाळ अपहरणाचा पर्दाफाश झाल्यानंतरच आपल्याला समजले. तिने जे काही सांगितले होते त्यावर विश्‍वास ठेवत होतो. तिने रचलेल्या या प्रकरणाचा थांगपत्ताही नव्हता असेही सांगितले होते. त्याने दिलेल्या जबानीत व न्यायालयातील खटल्यावरील सुनावणीवेळी दिल्या जाणाऱ्या जबानीत विसंगती येऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याची जबानी नोंदविण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार गेल्या शुक्रवारी (18जून) त्याला जबानीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्या दिवशी तो पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी बाल न्यायालयात असल्याने उपस्थित राहू शकला नव्हता. त्यामुळे त्याचा हा कबुलीजबाब नोंदविण्यात आला आहे. 

माझा अट्टाहास नव्हताच...
मधलावाडा - वाळपई येथे वडिलोपार्जित घरामध्ये राहणारा मोहन गावस हा ईस्टील या कंपनीत कामाला आहे. माझा पुत्राचा अट्टाहास नव्हताच असे त्याने सांगितले होते. पत्नीने प्रसूतीनिमित्त गोमेकॉ इस्पितळात जाताना सांगितले नाही तसेच त्यानंतर घरी येताना ती एकटीच आली. कपड्यात गुंडाळलेल्या बाळाला घेऊन आली तेव्हा तिने कोणालाच बाळाचा चेहरा दाखविला नव्हता. कोरोनामुळे त्याला अलिप्त ठेवण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या असल्याचे ती सांगत असल्याने त्यावर विश्‍वास ठेवण्यात आला. महिनाभर हे बाळ एका खोलीत ठेवून ती कोणालाही तेथे येऊ देत नव्हती. कोरोनामुळे त्या बाळाच्या तोंडात छोटी नळी घातल्याने त्याच्या रडण्याचा आवाज येत नसल्याचेही ती सांगत होती, असे त्याने पोलिसांना सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com