सराईत गुन्हेगार मोविन फर्नांडिसला अटक

प्रतिनिधी
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

कोलवा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर विविध गुन्ह्यांत समावेश असलेला सराईत गुन्हेगार मोविन फर्नांडिस (२७, चिंचिणी) याला आज कोलवा पोलिसांनी कोलवाळे येथून अटक केली.

सासष्टी: कोलवा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर विविध गुन्ह्यांत समावेश असलेला सराईत गुन्हेगार मोविन फर्नांडिस (२७, चिंचिणी) याला आज कोलवा पोलिसांनी कोलवाळे येथून अटक केली. पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्याकडून एक दुचाकी आणि १ लाख 20 हजार रुपयांची सोनसाखळी जप्त केली असून मोविनकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या अन्य दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

दुचाकीची चोरी, सोनसाखळी हिसकाविणे व अन्य गुन्ह्यात समावेश असलेल्या मोविन फर्नांडिस विरुध्द अन्य पोलीस ठाण्यातही अनेक गुन्हे नोंद असून हल्लीच एक महिलेची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी कोलवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. कोलवा पोलिस त्या दिवसापासून मोविन फर्नांडिस याचा शोध घेत होते तर आज मोविन कोलवाळे येथे फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित त्याठिकाणी पोहचून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक दुचाकी व सोनसाखळी जप्त केली आहे. 

मोविन फर्नांडिसकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या अर्जुन गिरवाळे (आकेबायश) आणि राजू काळघाटकर (रिवण) यानाही पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई कोलवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित वेळीप, कॉन्स्टेबल विकास कौशिक, जावेद कलास आणि संजय गावकर यांनी केली. कोलवा पोलिसांनी अटक केलेल्या मोविनविरुध्द भादंसंच्या ३७९, ३५६ आणि ४११ या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

संबंधित बातम्या