Goa Rain Impact: हातातोंडाशी आलेल्या भाजीपाल्याची नासाडी, पावसामुळे शेतकरी चिंतेत

टोमॅटो, कोथिंबिरीचा भाव वधारला असून दर आणखी वाढण्‍याची शक्‍यता..
Vegitables
VegitablesDainik Gomantak

गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे येत्या काळात भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महिनाभरापासून कोथिंबिरीचा दर 20 रुपयांवर स्थिर होता. मात्र, आता त्यात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. गणेशोत्सवात भाजीपाल्याला मोठी मागणी होती. मात्र, या काळात भाजीपाल्याच्या दरात स्थिरता होती. कोथिंबिरीसह टोमॅटोच्या दरातही दहा ररुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 30 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा टोमॅटो आता 40 रुपयांनी विकला जातोय.

गणेशचतुर्थीनंतर आता पितृपक्ष सुरू आहे. त्यानंतर पुन्हा नवरात्रोत्सवाला सुरवात होणार असून भाजीपाल्याची मागणी वाढतच राहणार आहे.

Vegitables
100 वर्षांची परंपरा असलेल्या सडा येथील गणेशोत्सवाची आज सांगता

काकडी, चिबूड बाजारात दाखल: राज्यात ग्रामीण भागात आता गावठी भाजीपालादेखील मोठ्या प्रमाणात फुलला आहे. भेंडी, दोडकी, वाली, काकडी, भोपळा, चिबूड आदी भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चिबूड 100 ते 150 रुपयांपर्यंत आकारानुसार विकला जात आहे तर गावठी काकडी 10 रुपयांना एक या दराने विकली जात आहे. ग्रामीण भागात पिकणाऱ्या या भाज्यांना दरदेखील चांगला आहे. मात्र, मागणीएवढा पुरवठा होताना दिसत नाही.

Vegitables
100 वर्षांची परंपरा असलेल्या सडा येथील गणेशोत्सवाची आज सांगता

भाजीपाल्याचे दर प्रतिकिलो रु.मध्ये

कांदा- 30, बटाटा- 40, टोमॅटो- 40, कोबी- 40,

फ्लॉवर- 40, कारले- 60, शिमला मिरची- 80, बिन्स- 120, कोथिंबीर- 30, पुदिना- 10, लिंबू- 3-4 नग रु. 10

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com