अखेर मान्सून परतला!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

गोवा वेधशाळेने २८ ऑक्टोबर रोजी मान्सून परतला असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता राज्यात तापमान येत्या काही दिवसात वाढणार असल्याची शक्यतासुद्धा हवामान तज्‍ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

पणजी : गोवा वेधशाळेने २८ ऑक्टोबर रोजी मान्सून परतला असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता राज्यात तापमान येत्या काही दिवसात वाढणार असल्याची शक्यतासुद्धा हवामान तज्‍ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

मान्सून परतल्याची बातमी शेतकरी वर्गाला नक्कीच आनंद देणारी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळवाऱ्यासह पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काहींची पिके जमिनीवर आडवी झाली, तर काहींच्या अंगणात काढून ठेवलेल्या भातावर पिकावर पावसाने घाला घातला. आता पाऊस परतला आहे, तर शेतीतील कामे लगबगीने यावरून घेण्याच्या तयारीत बळीराजा दिसत आहे. गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी राज्यात पावसाची नोंद झाली नाही. तसेच राज्यातील वातावरण कोरड्या स्वरूपाचे होते.

संबंधित बातम्या