गोव्यासह कोकणात मॉन्सून 'इलो रे'

गोव्यासह कोकणात मॉन्सून 'इलो रे'
Monsoon

पणजी : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनने (Monsoon) पुन्हा गती पकडली असून, आज थेट गोव्यासह (Goa) महाराष्ट्रात (Maharashtra) धडक मारली आहे. अंदमानापासून ते केरळपर्यंतची त्याची वाटचाल काहीशी मंदावली होती. पण केरळातून दोनच दिवसांत त्याने गोव्यातून, कोकणमार्गे महाराष्ट्रात धडक मारली आहे. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते दक्षिण केरळ किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.  पुढील काही दिवसांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. 

3 जूनला लक्षद्वीप आणि दक्षिण केरळात दाखल झाला. नंतर काही तासांतच संपूर्ण केरळ आणि तामिळनाडूला व्यापत कर्नाटकच्या किनारपट्टीवर येऊन दस्तक दिली. यानंतर अवघ्या काही तासांत गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित भाग, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि दक्षिण कोकणात मान्सूनने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे याठिकाणी मान्सूनने आगमन केलं आहे. यानंतर मान्सून दक्षिण मध्य महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागाला मान्सून व्यापून टाकणार असल्याची सुधारित माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com