Monsoon in Goa
Monsoon in GoaDainik Gomantak

गोवा हवामान खात्याचे मत ‘हा मॉन्सूनपूर्व पाऊस’

हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनुसार राज्यात पडत असलेला पाऊस हा मॉन्सूनपूर्व पाऊस असून मॉन्सून सक्रिय होण्यासाठी अद्यापही वेळ आहे.

पणजी : बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार बेट आणि केरळमध्ये वेळेअगोदर दाखल झालेला मॉन्सून यंदा राज्यातही वेळेआधीच तीन दिवस दाखल झाला आहे, असे मत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त वैज्ञानिक डॉ. एम. रमेश कुमार यांनी व्यक्त केले आहे. परंतु हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनुसार राज्यात पडत असलेला पाऊस हा मॉन्सूनपूर्व पाऊस असून मॉन्सून सक्रिय होण्यासाठी अद्यापही वेळ आहे. (Monsoon in goa)

Monsoon in Goa
कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यू हृदयविकाराने

राज्यात मॉन्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी दुपारी हवामान खात्याच्या बैठकीनंतर होऊ शकते. मॉन्सून आल्यानंतर पाऊस येतोच असे नाही. मात्र, पावसासाठीची पूरक स्थिती निर्माण होते. यंदा जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमीच असेल. जुलै महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढेल आणि पाऊस सरासरी इतका होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. एम. रमेशकुमार यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांत मॉन्सूनच्या केरळमध्ये दाखल होण्याबाबत यंदा प्रथमच वाद निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय हवामान क्षेत्रात काम करणाऱ्या स्कायमेट संस्थेने म्हटले आहे की, भारतीय हवामान विभाग नेहमी अत्यंत काटेकोर पद्धतीने निकषांच्या आधारित मॉन्सून आल्याचे जाहीर करतो. यंदा मात्र तसे दिसत नाही. मॉन्सूनसाठी आवश्यक असलेली पोषक स्थिती, नैऋत्य मॉन्सून वारा, वाऱ्यांचा वेग आणि ढगांची स्थिती यावरून मॉन्सून आल्याचे जाहीर करण्यात येते. यंदा मात्र तशी परिस्थिती नाही. पुढील काही दिवस भारतीय उपखंडात पाऊस नाही, असा दावा ‘स्कायमेट’ने केला आहे.

Monsoon in Goa
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्थसहाय्य त्वरित द्या : कुतिन्हो

सत्तरी तालुक्याला झोडपले

वाळपई : सत्तरी तालुक्यात आज सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावत उकाड्यामुळे हवालदिल झालेल्या लोकांना दिलासा दिला. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढला होता. आज, गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पंधरा दिवसांपूर्वीही पावसाने सत्तरीला झोडपून काढले होते. त्यानंतर आज पुन्हा पावसाने जोरदार आगमन केले. पावसाची रिमझिम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. बागायतीत कामासाठी गेलेल्या कामगारांची बरीच धावपळ उडाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com