''मॉन्सून म्हणजे पाऊस नव्हे'' 

''मॉन्सून म्हणजे पाऊस नव्हे'' 
mansoon 1.jpg

'धरण बांधले आणि पावसाळा कोरडा' त्या ओळी आहेत प्रसिद्ध कवी पद्मश्री दया पवार (Daya Pawar) यांच्या. व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या या ओळींची आठवण होण्याचे कारण हवामान खात्याने मॉन्सून (Monsoon) जाहीर केला असला तरी पावसाचा अद्यापी पत्ता नाही. मात्र 10 जून नंतर बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार होवून मान्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम किनारपट्टी वरील कर्नाटक (Karnataka), गोवा (Goa) आणि महाराष्ट्राला (Maharashtra) लाभ होणार असून 11,12  आणि 13 जून ला मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. (Monsoon is not rain)

मान्सून एक हवामान बदलाची मोठी प्रक्रिया असते. दक्षिण आशियाई देशातला मोठा बदल असतो. आपला देश कृषी प्रधान देश असल्याने मान्सून ला अन्याय साधारण महत्व आहे .त्याच्यावर साऱ्या देशाची अर्थव्यवस्था (economy) त्यावर चालते. समुद्रामध्ये निर्माण होणारी आद्रता नैऋत्य मौसमी वारे वाहून आणतात. आणि त्याचे रुपांतर पावसात होते. सामान्यपणे मान्सून आला म्हणजे पाऊस पडणार अशी सामान्य माणसांची धारणा असते. मात्र समुद्रावरून वाहणाऱ्या वारांना मिळणारा गती, समुद्रावर तयार होणारी आद्रता, आणि पावसासाठीची पोषक स्थिती यावरून पाऊस पडतो. त्यामुळे पावसापूर्वी येणारे वारे म्हणजे मान्सून होय. असे मत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी व्यक्त केला आहे.

सध्या देशाच्या नैऋत्य इकडून येणारे वारे ,त्यांचा वेग आणि समुद्रातील आद्रता यांचा विचार केला तर पुढच्या दोन- चार दिवसांमध्ये पावसासाठीची पोषक स्थिती नसली तर या दरम्यानच्या काळात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे पाऊस आणू शकतात नैऋत्य मान्सून ही भारतीय उपखंडासाठीची वार्षिक जागतिक घडामोड (ग्लोबल फिनॉमिना) आहे. हिंद महासागर, अरबी समुद्र (Arabian Sea) आणि बंगालच्या उपसागरात ही परिस्थिती निर्माण होते आणि त्या आधारावर भारतीय उपखंडाला मोठा पाऊस मिळतो. मान्सूनचा विचार केला तर, कधी तो लवकर येतो तर कधी उशिरा येतो. यंदा मात्र वेळेवर आणि अधिकचा पाऊस पडेल.

सध्या गोव्यात आणि पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय नसला तरी त्याचे स्वरूप जोरकस नाही मात्र 9 आणि 10 जूनला यामध्ये बदल होतील आणि 11 आणि 12 जूनला गोव्यात आणि  महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com