Monsoon: गोव्यात आज पावसाचा जोर; प्रशासन सज्ज
monsoon goa rain

Monsoon: गोव्यात आज पावसाचा जोर; प्रशासन सज्ज

पणजी: राज्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. आज सोमवारी ‘रेड अलर्ट’ जारी असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. आवश्‍यकता नसल्यास नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे. रविवारी मात्र संततधार कायम होती.  

सत्तरी, साखळी, म्हापसा, जुने गोवे आणि पेडणेसह घाटमाथ्यावर दिवसभर पाऊस सुरू होता. कोणकोण भागात तुलनेने कमी पाऊस असतानाही एका ठिकाणी भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. इतर ठिकाणी मात्र अनुचित घटना घडल्या नसल्या तरी रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीला फटका बसल्याचे प्रकार सर्रास पहावयास मिळाले. चोर्ला घाटात संततधार पावसामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.  सोमवारी काही भागात पुरस्थितीसह भूस्खलनाच्या घटनांची शक्यता असल्याने प्रशासनाने सज्जता केली आहे. मंगळवार आणि बुधवारीदेखील ‘ऑरेंज अलर्ट’ कायम राहणार असून गुरूवारी पाऊस उसंत घेईल, अशी माहिती हवामान वेधशाळेचे एम. राहूल यांनी दिली.

पावसाची नोंद (मीमीमध्ये)

  • पणजी............28.2
  • मुरगाव...........17.6
  • म्हापसा...........20.5
  • जुने गोवे..........27.5
  • पेडणे..............28.5

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com