Orange Alert: गोव्यात वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार

Orange Alert: गोव्यात वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार
Orange Alert

पणजी: राज्यात(Goa) दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात मुसळधार(Monsoon) पावसासह वाऱ्याचाही वेगही वाढणार आहे, त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरही होणार आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी. इतका असेल. किमान तीन दिवस म्हणजे शनिवार ते सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस होईल. दरम्यान, राज्यात वादळाची शक्यता असल्याची चर्चा असली तरी तसे कोणतेही संकेत हवामान वेधशाळेने दिलेले नाहीत.

पश्चिम बंगालपर्यंत मॉन्सूनची मजल
महाराष्ट्र व्यापल्यानंतर अरबी समुद्राचा उत्तर भाग, दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याच्या अनेक भागांत व पश्चिम बंगाल आणि बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शुक्रवारी दाखल झाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com