गोव्यातील स्मारके 21 जून पर्यंत बंद राहणार

गोव्यातील स्मारके 21 जून पर्यंत बंद राहणार
goa m.jpg

Covid-19 च्या साथीमुळे गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली संरक्षित स्मारके आणि संग्रहालये आजपासून खुली होत असली तरी संचारबंदीच्या (Curfew) कारणावरून गोव्यातील (Goa) सर्व स्मारके आणि संग्रहालये 21 जून पर्यंत बंद राहणार आहेत. यात भारतीय पुरातत्व विभाग (Department of Archeology of India) ,गोवा पुरातत्व विभाग (Goa Archaeological Department) यांच्या अखत्यारीत असलेली सर्व स्मारके, संग्रहालये आणि खाजगी संग्रहालये सुद्धा 21 जून पर्यंत बंद राहणार आहेत.

गोव्यात ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च (St. Francis Xavier Church) कॉम्प्लेक्स आणि संग्रहालय, सेंट बासिलिका ऑफ जीजस आणि भारतीय पुरातत्त्व खात्याचे संग्रहालये असून भारतीय नौदलाचे आणि भारतीय कस्टमचे मोठे संग्रहालये गोव्यात आहेत. ही सर्व संग्रहालय पर्यटकांचे मोठे आकर्षण आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com