Mopa Airport चा गोव्यासह कोकणालाही फायदा; हॉस्पिटॅलिटी उद्योगात तब्बल 2700 कोटींची गुंतवणूक येणार

या विमानतळ प्रकल्पानंतर, उत्तर गोव्यातील मालमत्तांच्या किमतींत वार्षिक 25-30% पर्यंत वाढ अपेक्षित आहे.
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

गोवा राज्यांच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन  ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या कार्यरत असलेल्या दाबोळी विमानतळानंतर गोव्यातील हे दुसरे विमानतळ असेल आणि देशातील इतर विमान वाहतूक प्रकल्पांप्रमाणेच मोपा  हे पेडणे, उत्तर गोवा आणि लगतच्या सिंधुदुर्ग आणि कोकण पट्ट्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

या विमानतळ प्रकल्पानंतर, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. उत्तर गोव्यातील मालमत्तेच्या किमतींमध्ये (जमिनींमध्ये ) वार्षिक 25-30% पर्यंत वाढ अपेक्षित आहे. ऍक्सॉन डेव्हलपर्सच्या अहवालानुसार, एकूण गुंतवणुकीच्या 38.5% गुंतवणूक भूसंपादनासाठी वापरली जाईल, तर उर्वरित बांधकाम आणि इतर खर्चासाठी वापरली जाईल. या अनुषंगाने येथे जवळपास रु. 2,700 कोटी गुंतवणूक ही 'लक्झरी हॉटेल्स, इको हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे' इत्यादी विकसित करण्यासाठी वापरली जाईल.

Mopa Airport
Startups Goa : गोवा बनवणार क्रिएटिव्ह हब; 12 स्टार्टअप्सना 3.28 कोटी

मोपा विमानतळामुळे कोकणातील पर्यटन क्षेत्राचा विस्तार होऊ शकेल. कोकण आणि उत्तर गोव्यातील आणखी एक उल्लेखनीय पैलू म्हणजे येथे असलेल्या पोर्तुगीज, कोकणी, महाराष्ट्रीयन यांसारख्या संस्कृतींचा सुंदर मिलाफ असून इथली खाद्य संस्कृतीची खाद्यप्रेमींना चव चाखता येणार आहे. 

Mopa Airport
Goa Drug Case: गोव्यात ड्रग्ज विरोधातील कारवाई आणखी तीव्र; कळंगुटमधून आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या

कोरोना आणि लोकडाऊन नंतर गोव्याचे पर्यटन 70% पेक्षा जास्त आहे. विकेंडला येणाऱ्या पर्यटकांमुळे ते 100% पर्यंत पोहोचते. विमानतळ प्रकल्प ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी सोन्याची संधी बनणार आहे.

.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com