
पेडणे तालुक्यातील नवीन मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी उद्घाटनावेळी केली होती. त्यानंतर बुधवारी ४ जानेवारी २३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या नावाला अधिकृत मान्यता देण्यात आली.
परंतु ‘जीएमआर’ कंपनीला ‘मनोहर’ नावाचा विसर पडला असून ‘न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ नावाचेच फलक अजूनही रस्तोरस्ती झळकत आहेत.
नागरी उड्डाण मंत्री, गोवा राज्य प्राधिकरण, मुख्य सचिव, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि राज्यपाल यांच्याकडे या प्रकरणी स्थानिक पत्रकार ज्ञानेश्वर वरक यांनी ईमेल द्वारे तक्रार केली आहे. वरक यांनी या तक्रारीत म्हटले आहे, की जीएमआरने कराराचे उल्लंघन केले आहे.
‘जीएमआर’ कडून कराराचे उल्लंघन !
करारातील मुद्दा क्र. ५ प्रमाणे विमानतळ किंवा त्याच्या कोणत्याही भागाला जीएमआर किंवा त्याच्या भागधारकांचे नाव किंवा ओळख जाहिरात करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी किंवा परावर्तित करण्यासाठी कोणत्याही प्रकारे ब्रॅण्डिंग केले जाणार नाही.
स्वतःच्या नावाचा प्रचार करण्यासाठी विमानतळाचा वापर केला जाणार नसल्याचे करारात नमूद करण्यात आले आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी किंवा इतर संबंधित कारणासाठी विमानतळावरील सूचना फलकाचा वापर ‘जीएमआर’ कडून केला जाईल. संबंधित सरकारी प्राधिकरणाने जाहीर केलेल्या नावाचाच जीएमआर वापर करणार आहे.
"एका खाजगी कंपनीकडून सरकारशी केलल्या कराराचे उल्लंघन होत आहे. एक जागरूक नागरिक आणि पत्रकार या नात्याने 24 फेब्रुवारी रोजी सदर पत्र ई-मेलद्वारे ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे काम आपण केले."
"परंतु सरकारकडून याची कोणतीच दखल घेतली जात नाही,ही खंत आहे. माजी केंद्रीय मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा मान राखण्यासाठी जीएमआर कंपनीला धाक दाखवणे गरजेचे आहे."
- ज्ञानेश्वर वरक, पत्रकार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.