मोप विमानतळ प्रकल्पासाठी स्थानिकांची जमीन हडपण्याचा प्रयत्न

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

पेडण्यातील मोपा विमानतळ प्रकल्पासाठी जोडणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरून तेथील स्थानिकांची जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने तीव्र आंदोलन सुरू झाले आहे

पणजी: पेडण्यातील मोपा विमानतळ प्रकल्पासाठी जोडणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरून तेथील स्थानिकांची जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीनी त्या शेतकऱ्यांना भेटून बाजू ऐकून घेण्यास प्रयत्न केला नव्हता. आता हे आंदोलन चिघळण्याची लक्षणे दिसू लागल्यावर त्यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावत आहे.

त्यांच्या या भूलथापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये. या शेतकऱ्यांनी जमिनींचे संरक्षण करताना अस्तित्व राखण्यासाठी हे आंदोलन केले आहे. या प्रकल्पासाठी जोडणारा रस्ता हा महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात स्थानिकांची शेती व बागायती नष्ट होणार असल्याने शेतकऱ्यांचे अस्तिवच धोक्यात आले आहे. या कामामध्येही मोठ्या प्रमाणात ३० टक्के कमिशनची चर्चा गावात सुरू आहे अशी टीका गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते ॲड. जीतेंद्र गावकर यांनी केली.

गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ -

गोव्यातील बारा आमदार अपात्रता प्रकरणी मगो आणि काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव -

संबंधित बातम्या