'पर्यटन हंगामासाठी मोपा विमानतळ होईल सज्ज'

रोहन खंवटे: आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी करणार चर्चा
Mopa airport ready for tourist season
Mopa airport ready for tourist seasonDainik Gomantak

पणजी: राज्याच्या पर्यटन विकासासाठी मोपा विमानतळ प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. येत्या पर्यटन हंगामासाठी मोपा विमानतळ सज्ज होईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. यासाठी येत्या 15 दिवसांत विमानतळ प्राधिकरण जीएमआर कंपनी आणि पर्यटन खाते संयुक्तपणे बैठक घेणार आहे, असेही खंवटे म्हणाले.

उत्तर गोव्यातील मोपा पठारावर साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पाला मंत्री रोहन खंवटे यांनी भेट देऊन पाहणी करून जीएमआर आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रकल्पाच्या उभारणीसंबंधी सविस्तर चर्चा केली. यावेळी खंवटे म्हणाले, की दाबोळी विमानतळ नागरी प्रवाशांसाठी सुरूच राहील.

Mopa airport ready for tourist season
'गोवा कला अकादमीचे नूतनीकरण आंतरराष्ट्रीय मानांकनानुसारच'

नौदलाचे वाढलेले महत्त्व आणि कामकाज यामुळे या विमानतळाच्या विस्तारीकरणावर मर्यादा आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाढती संख्या चार्टर आणि खासगी विमाने यांची संख्या लक्षात घेता मोपा विमानतळ राज्यातील पर्यटन वृध्दीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबरोबरच हे विमानतळ कार्गो हब बनविण्याच्या दृष्टीकोनातूनही आमचे प्रयत्न असतील. देशी-विदेशी पर्यटकांसाठी विमानसेवा ही सामान्य वाहतूक व्यवस्था बनली आहे. सामान्य लोक आता विमान प्रवासाला महत्त्व आणि प्राधान्य देत असल्याने तातडीने हे विमानतळ सुरू होणे गरजेचे आहे. सध्या प्राधिकारण आणि जीएमआर कंपनीने 15 आॅगस्टचा मुहूर्त दिला आहे. त्यानुसार काम सुरू असल्याचे आता दिसत आहे. असे झाल्यास येत्या पर्यटन हंगामात हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल. यासाठी आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, पर्यटन सेवा संस्था यांच्याशी या महिन्याभरात चर्चा करण्यात येईल,असेही खंवटे म्हणाले.

‘रनवे’चे काम प्रगतिपथावर

मोपा ग्रीनफिल्ड विमानतळाच्या मुख्य रनवेचे काम पूर्णत्वास आले असून साईड रनवेचे काम प्रगतिपथावर आहे. याशिवाय टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. याबरोबरच राष्ट्रीय महामार्गाला जोडल्या जाणाऱ्या लिंक रोडचे काम जोरदारपणे सुरू आहे. विमानतळ बनवताना काही प्रमाणात वृक्ष तोड करण्यात आली होती. यासाठी वन विभागाच्या सहाय्याने येत्या काही दिवसात विमानतळ प्राधिकरण सहा हजार झाडे लावणार आहे,प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mopa airport ready for tourist season
गोव्यातील तारांकित हॉटेलसाठी 30% ‘एफएआर’

स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या काही समस्या किंवा काही सूचना असतील, तर त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे मांडाव्यात आणि त्या ते मांडतील व मुख्यमंत्री त्यावर योग्य तोडगा काढतील.

- रोहन खंवटे,

आपल्याला पर्यटनमंत्र्यांच्या भेटीची कुणीही माहिती दिलेली नव्हती. आपणाला साधी कल्पना दिली असती, तर आपणही उपस्थित राहिलो असतो. मंत्री रोहन खंवटे यांनी आपल्याला का कळवले नाही हे काही आपल्याला माहीत नाही.

- प्रवीण आर्लेकर, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com