मोप विमानतळाचे 2022 मध्ये लोकार्पण; संचालक सुरेश शानभोग यांची माहिती

plane.jpg
plane.jpg

पणजी: मोप (Mopa) येथील आंतरराष्ट्रीय हरित विमानतळ (Airport) प्रकल्पाच्या लोकार्पणाची तारीख केंद्र सरकारने निश्चित केली आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी या विमानतळाचे लोकार्पण केले जाणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation)तसे पत्र राज्य सरकारच्या हवाई वाहतूक संचालनालयाला पाठवले आहे. संचालक सुरेश शानभोग यांनी ही माहिती ‘गोमन्तक''ला दिली. (Mopa International airport will be inaugurated on August 15, 2022)

मोप येथील विमानतळाचे काम फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यासाठी सरकारी पातळीवर सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 15 ऑगस्ट 2022 रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे.

या विमानतळावर स्थानिक युवक युवतींना रोजगार देण्यासाठी हवाई वाहतूक कौशल्य विकास केंद्र येत्या ऑक्टोबरमध्ये सुरु करण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, मोप, वारखंड, कासारवर्णे, चांदेल, उगवे, अमेरे या गावांसह आता धारगळ गावालाही प्रकल्पग्रस्त गावाचा दर्जा देण्यात आला आहे. धारगळला वैद्यकीय वाहन सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या विमानतळापासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचा आराखडा तयार केला असून त्याला केंद्रीय महामार्ग मंत्रालयाची प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळणे बाकी आहे. तेही काम लवकर सुरु केले जाईल.

मोप विमानतळाच्या धावपट्टीचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता चाचणीपूर्वी त्यावर विशिष्ट प्रकारच्या डांबराचा अंतिम थर घालणेच बाकी आहे असे सांगून ते म्हणाले, हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि तांत्रिक विभागाच्या इमारतीचा ताबा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे येत्या सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये दिला जाणार आहे. तेथे प्राधिकरण सर्व यंत्रणा बसवणार आहे. सध्या या विमानतळाचे काम करणाऱ्या जीएमआर कंपनीचे कार्यालय पर्वरीत आहे तेही विमानतळाच्या प्रशासकीय इमारतीत लवकरच हलवले जाणार आहे. या इमारतींचे अंतर्गत सजावटीचे काम सध्या सुरु आहे.

विमानतळ परिसरात डोंगर कापणीचे 65 टक्के काम तर भराव घालण्याचे 45 टक्के काम पूर्ण झाल्याचे नमूद करून त्यांनी सांगितले, की विमानतळ परिसराला कुंपण घालण्याचे काम निम्मे पूर्ण झाले आहे. हे कुंपण 26 किलोमीटरचे आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com