Mopa Police Station: पत्र्याच्या शेडमध्ये ‘मोपा पोलिस ठाणे’

संजय बर्डे ः अनेक गैरसोयी, त्वरित सुधारणा करण्याची गरज
Mopa Police Station
Mopa Police Station Dainik Gomantak

Mopa Police Station घाई गडबडीत सुरू करण्यात आलेले मोपा पोलिस ठाणे अद्याप पत्र्याच्या शेडमध्येच कार्यरत अनेक गैरसोयींना पोलिसांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा पोलिस ठाण्यात त्वरित सुधारणा करण्याची गरज आहे, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी सांगितले.

बर्डे म्हणाले, हे पोलिस ठाणे विमानतळाच्या आत असल्याने पोलिस ठाण्यात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. त्यानंतर आत प्रवेश देण्यात येतो. संपूर्ण पोलिस ठाणे हे पत्र्यांच्या शेडमध्ये उभारलेले आहे.

ठाण्याच्या खोल्या या अरुंद आहेत, त्यात कसे तरी पोलिस कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. पत्र्यांचे छप्पर व बाजूलाही पत्रे यामुळे उकाड्यात आत रहाणे कठीण आहे.

Mopa Police Station
Kala Academy: पंचवाडीचे ‘शी! कांवळो आपुडला’ प्रथम

पोलिसांनी कोणाकडे तक्रार करावी? हा प्रश्न आहे. गृह खाते असलेल्या मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी याची त्वरित दखल घेणे गरजेचे आहे. मोपा विमानतळाची एकच धाव पट्टी सध्या कार्यवाहीत आहे.

विमानतळाची अनेक कामे पूर्ण झालेली नाहीत. पोलिस ठाणे गैरसोयीनी युक्त आहे, असे असताना हे सर्व घाई गडबडीत सुरू करण्याची काय गरज होती? असा प्रश्न बर्डे यांनी यावेळी केला.

Mopa Police Station
Smart City: स्मार्ट सिटी’वर नगरसेवकांकडूनच टीका

भाजपने शेडमध्ये मेळावा घ्यावा

मुख्यमंत्री व भाजपला माझे आव्हान आहे, की या पोलिस ठाण्यात भाजपचा एक मेळावा घ्यावा. भाजप सरकारने अदानीच्या फायद्यासाठी सिलिंडर गॅसमध्ये वाढ केली आहे.

सरकारने आता पत्र्यांच्या पोलिस ठाण्यात लोकांना गरम पाणी किंवा स्वयंपाक करण्याची सोय करून द्यावी, म्हणजे गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या भावाची झळ कमी केल्याचे श्रेय सरकारला मिळेल, असा चिमटाही संजय बर्डे यांनी यावेळी काढला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com