मोपकर मेडिकल स्‍टोअर्सतर्फे इब्रामपुरात जनजागृती

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

साळ गावात एक कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्ण सापडल्यामुळे तसेच हा रुग्‍ण कामानिमित्त इब्रामपूर गावातील लोकांच्‍या संपर्कात आल्‍यामुळे तेथे घबराट पसरली होती. त्यावेळी पंचसदस्‍य खडपकर यांनी पंचायत मंडळाच्‍या सहकार्याने त्‍या रुग्‍णाच्‍या संपर्कात आलेल्‍या संशयित लोकांना चाचणीसाठी कासारवर्णे इस्‍पितळात नेऊन त्‍यांची पडताळणी चाचणी करून घेतली. ती चाचणी नकारात्मक आल्‍याने दिलासा मिळाला.

पणजी :

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर मोपकर मेडिकल स्टोअर्स म्हापसा व इब्रामपूरचे पंचसदस्‍य राजेंद्र खडपकर यांनी प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी गोळ्यांचे इब्रामपूर पंचायतक्षेत्रात वितरण नुकतेच केले.
साळ गावात एक कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्ण सापडल्यामुळे तसेच हा रुग्‍ण कामानिमित्त इब्रामपूर गावातील लोकांच्‍या संपर्कात आल्‍यामुळे तेथे घबराट पसरली होती. त्यावेळी पंचसदस्‍य खडपकर यांनी पंचायत मंडळाच्‍या सहकार्याने त्‍या रुग्‍णाच्‍या संपर्कात आलेल्‍या संशयित लोकांना चाचणीसाठी कासारवर्णे इस्‍पितळात नेऊन त्‍यांची पडताळणी चाचणी करून घेतली. ती चाचणी नकारात्मक आल्‍याने दिलासा मिळाला.
कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी होमियोपॅथीच्या गोळ्यांचे मोफत वितरण म्‍हापसा येथील मोपकर मेडिकल स्टोअर्सचे मालक दत्ताराम (बाबू) मोपकर यांच्यावतीने इब्रामपूर येथील सातेरी विद्या मंदिर आवारात करण्यात आले. यावेळी त्‍यांनी जनजागृतीही केली. ग्रामस्‍थांचीही यावेळी मोठ्या संख्‍येने उपस्‍थिती होती.
हा जनजागृती कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी पंचसदस्‍य राजेंद्र खडपकर, सातेरी विद्या मंदिरचे मुख्‍याध्‍यापक सुभाष सावंत, समाजसेवक जयवंत नाईक, दीपक शिरोडकर, उल्हास मोपकर, निखिल परब, उमाकांत मोपकर, शुभम राणे, रोहित मोपकर, सातेरी विद्यामंदिर शाळेचे चेअरमन श्री. मधुकर व अन्‍य ग्रामस्‍थांनी सहकार्य केले.
पंचायत परिसरातील सर्व लोकांनी बाबू मोपकर यांनी प्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध दिल्याबद्दल आभार मानले.

संबंधित बातम्या