पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयावर मोर्चा

water supply discussion
water supply discussion

पर्वरी

ऐन उन्हाळ्यात सुकूर येथील रहिवाशांना तीव्र पाण्याची टंचाई भासत असून गेला महिनाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाकडे यासंबंधी रहिवाशांनी तक्रारी नोंदविल्या, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आज अखेर पर्वरी भाजप मंडळाच्या अध्यक्ष कुंदा चोडणकर, किशोर अस्नोडकर यांच्या नेतृत्वाखाली येथील पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन कार्यकारी अभियंते नितीन सिनाय नेवरेकर व सहायक अभियंते दीपक बोरकर यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप मंडळाचे अनेक कार्यकर्ते होते.
येथील रहिवाशांचे पाण्यासाठी बरेच हाल होत आहेत. त्यांना खासगी टँकरव्दारे पाणी आणावे लागत आहे. त्यासाठी त्यांना अव्वाच्या सव्वा दराने पैसे मोजावे लागत आहेत. पाणीपुरवठा खाते विनंती करूनही टँकर पाठवत नाही. एक कुपनलिका आहे, पण ती नादुरुस्त असून तिचा काहीच फायदा होत नाही. तूर्त खात्याने टँकर पाठवावे तसेच ती कुपनलिका त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी किशोर अस्नोडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.
एखाद्या दिवशी पाणी नसले, तर महिलांचे खूप हाल होतात. त्यासाठी खात्याने योग्य नियोजन करून सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे, असे कुंदा चोडणकर यांनी सांगितले. सध्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून पर्वरीला १३.८ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. मायणा सुकुर हा भाग उंचवठ्यावर असल्याने तेथे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास थोडी अडचण येत आहे. खात्याकडे अपुरे टँकर असून त्यातील काही टँकरचा करार संपलेला आहे. उरलेल्या तीन टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे अडचणी येतात. कुपनलीकेचे काम पावसाळ्यानंतर सुरू करणार आहोत. तूर्त मायणा सुकूर येथे पाणीपुरवठा सुरळीत होईल याकडे लक्ष दिले जाईल. तसेच तेथे पाण्याचे टँकर पाठविले जातील, असे आश्वासन कार्यकारी अभियंते नितीन नेवरेकर यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com