45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी  1 लाखाहून अधिक डोस उपलब्ध: डॉ. प्रमोद सावंत 

CM prmod Sawant.jpg
CM prmod Sawant.jpg

पणजी : येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याने 18 ते 45 वयोगटातील लसीकरण करण्यासाठी आधीच 5 लाख लसी ऑर्डर केल्या आहेत. तसेच 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी 1 लाखाहून अधिक डोसदेखील आपल्याकडे उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.  राज्याला तीन टप्प्यातील लसीकरणासाठी 4.3 लाख लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यातील सुमारे 2.5 लाख लोकांचे पहिल्या टप्प्यातील आणि  68 हजाराहून अधिक लोकांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. तर सध्या आपल्याकडे 1 लाखाहून अधिक डोस उपलब्ध आहेत. असेही प्रमोद सावंतांनी सांगितले आहे. (More than 1 lakh doses available for vaccination of citizens above 45 years: Dr. Pramod Sawant) 

त्याचबरोबर, लस उत्पादक कंपन्या क्षमता वाढविण्याच्या विचारात आहेत. तिसरी लसदेखील लवकरच उपलब्ध होईल.  गोवाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) कडे 5 लाख डोसची ऑर्डर दिली आहे. आम्हाला डोस मिळाल्यावर 18-45 वयोगटातील लसीकरण सुरू केले जाईल.  त्याचबरोबर, आतापर्यंत आपण लसीकरणासाठी तीन टप्पे केले होते. यातील पहिला, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, दूसरा, आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि तिसरा टप्पा म्हणजे 45 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी. इतकेच नव्हे तर, रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली आहे. 

तसेच, राज्यातील सर्व नागरिकांचे चौथ्या टप्प्यातील लसीकरण यशस्वी करण्याची जबाबदारी आता  राज्यसरकारची आहे. त्यासाठी आम्ही लसीकरण कार्यक्रमाची सविस्तर योजना तयार आहोत. योग्य वेळी ही योजना जाहीर केली जाईल.  लसीचे स्लॉट उपलब्ध झाले की, सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांचे लसीकरण केले जाईल. असेही प्रमोद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, लस आणि लसीकरण मोहिम  ही दोन्ही कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी समाधनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.  देशातील संशोधक आणि औषधी उद्योगाच्या प्रयत्नांमुळे दोन घरगुती लसी उत्पादन घेणे हे भारताचे भाग्य असल्याचे मत प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com