'पणजी महापालिका निवडणुकीत ८० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी'

'पणजी महापालिका निवडणुकीत  ८० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी'
CCP

पणजी- तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आता मंडळाच्या एकूण ३० नगरगसेवकांपैकी किमान ८० टक्के उमेदवार नवे असणार आहेत, असे आज पत्रकारांना सांगितले.

सध्याच्या मंडळांतील बहुतांश चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचे यापूर्वीच भाकित ‘गोमन्तक'ने वर्तविले होते.

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) मंडळावर संचालक म्हणून नियुक्त झाल्यानंतर पहिल्याच बैठकीस बाबूश यांनी उपस्थिती लावली. इतर सहाजणांना पुन्हा तिकीट मिळू शकते, त्यामुळे ते सहाजण कोण याविषयी नगरसेवकांनी आतापासून अटकळ बांधण्यास सुरुवात केली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com