Fraud Case: एक हजार गुंतवणूकदारांना 7 कोटींचा गंडा

उत्तरप्रदेशची कर्मभूमी इन्फ्राटेक रिआलिटी कंपनी गोव्यातून पसार
Fraud Case
Fraud CaseDainik Gomantak

मथुरा-उत्तरप्रदेश येथील कर्मभूमी इन्‍फ्राटेक रिआलिटी कंपनीने गोव्यातील सुमारे 1 हजारांहून अधिक गुंतवणूकदांना 7 कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचे अध्यक्ष देवेंद्र पाल सिंग, व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सिंगर व व्यवस्थापक नीलेश सुर्वे तसेच कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे पदाधिकारी व अधिकारी सध्या फरारी असल्याची माहिती कक्षाच्या पोलिसांनी दिली.

उत्तरप्रदेश येथे मुख्यालय असलेल्या कर्मभूमी इन्फ्राटेक रिआलिटी कंपनीने गोव्यात फोंडा येथे 2013 तर म्हापशात 2018 मध्ये कंपनीच्या शाखा सुरू केल्या होत्या. या दोन्ही शाखांमध्ये गुंतवणूक भरमसाट व्याजदर देऊन आकर्षित केले होते. कंपनीने काही एजंटही नेमले होते. या एजंटांनीही गुंतवणूकदारांचे पैसे या कंपनीत गुंतविले होते.

काही वर्षे गुंतवणूकदारांना भरमसाट व्याजदर मिळू लागल्याने त्यांचाही या कंपनीवरील विश्‍वास वाढला. त्यामुळे इतरांनीही या कंपनीत मोठ्या रक्कमा गुंतवणूक केल्या होत्या. गेल्यावर्षी या कंपनीने कार्यालये बंद करून पळ कढला. एजंटांनी या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते फोन घेत नव्हते.

व्याजासह रक्कम 10 कोटी

गुंतवणूकदारांनी एजंटांच्या मागे पैसे परत करण्याचा तगादा लावल्याने काही एजंटांनीच आर्थकि गुन्हे कक्षेकडे तीन वेगवेगळ्या तक्रारी या कंपनीविरुद्ध दाखल केल्या होत्या. या तक्रारींमुळे सुमारे एक हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची नावे आहेत. या गुंतवणूकदारांची मूळ रक्कम 7 कोटी रुपये आहे तर व्याजासह ही रक्कम 10 कोटींवर जाते, अशी माहिती कक्षाच्या पोलिसांनी दिली.

2015 मध्ये फसवणुकीची तक्रार-

आर्थिक गुन्हे कक्षाने कंपनीच्या म्हापसा व फोंडा येथील कार्यालयाच्या पत्त्यावर नोटीस पाठवली होती. त्यानंतर उत्तरप्रदेश येथील मुख्यालयाच्या पत्त्यावर नोटीस पाठवली. मात्र, या सर्व नोटिसा कोणी न घेतल्याने त्या परत आल्या आहेत. या कंपनीविरुद्ध 2015 मध्ये अशाच प्रकराची फसवणुकीची तक्रार दाखल झाली होती. तेव्हा ‘सेबी’ने या कंपनीच्या संचालकांना गुंतवणूकदाराचे पैसे तीन महिन्यांत परत करण्याचे निर्देश दिले होते तसेच या कंपनीवर अनेक निर्बंध घातले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com