Yuva Shakti Card: अवघ्या 36 तासात 15 हजारहून अधिक तरुणांनी केली नोंदणी

योजना लॉंच झाल्याच्या काही तासातच गोव्यातील नागरिकांनी याला भरघोस असा प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 36 तासांमध्ये 15,000 हून अधिक तरुणांनी गोव्यात या युवा शक्ती कार्डसाठी नोंदणी केली आहे.
Yuva Shakti Card: अवघ्या 36 तासात 15 हजारहून अधिक तरुणांनी केली नोंदणी

Yuva Shakti Card

Twitter/AITC Goa

Yuva Shakti Card: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections) पार्श्वभूमीवर गोव्यातील सर्वच पक्षांमध्ये विजयासाठी रस्सीखेच दिसून येत आहे. प्रत्येक पक्षातर्फे गोव्यातील जनतेला आणि मतदार राजाला खूश करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, मध्यंतरी आपने (AAP) गृहीणींसाठी मासिक आर्थिक मदत करण्यासाठी योजना तयार केली. यातच आता रविवारी तृणमूल (TMC) पक्षातर्फे 'युवा शक्ति कार्ड' ही योजना लॉंच करण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p>Yuva Shakti Card</p></div>
Vaccination: गोव्यात 5 हजारापेक्षा अधिक मुलांनी घेतला लसीकरणाचा लाभ

या योजनेतर्फे त्यांनी 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 'युवा शक्ति कार्ड' ही एक क्रेडिट कार्ड (Credit Card) स्वरूपात असणार आहे. या कार्ड च्या माध्यमातून तरुण वर्गाला कर्ज उपलब्ध होणार आहे. जवळजवळ 20 लाखांपर्यंतचे कर्ज या कार्डच्या माध्यमातून मिळणार असून याचा व्याजदर फक्त 4% टक्के इतकाच असणार आहे.

<div class="paragraphs"><p>Yuva Shakti Card</p></div>
प्रवीण आर्लेकर तर ड्रग डीलर,...: बाबू आजगावकर

ही योजना लॉंच झाल्याच्या काही तासातच गोव्यातील नागरिकांनी याला भरघोस असा प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 36 तासांमध्ये, 15,000 हून अधिक तरुणांनी गोव्यात या युवा शक्ती कार्डसाठी नोंदणी केली आहे. ज्या तरुणांना देशात किंवा परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्य विकास, व्यवसायाचा विस्तार किंवा स्टार्ट-अप मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ह्या योजनेमार्फत मिळणाऱ्या कर्जाचा वापर करता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com