मुरगाव पालिका तीन प्रकल्प उभारणार

प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

 विद्यमान पालिका मंडळाची मुदत संपण्यास एक महिना शिल्लक असताना मुरगाव पालिकेने चौदाव्या वित्त आयोगाचे २३ कोटी रुपये वास्को मासळी मार्केट, पालिका इमारत नुतनीकरण आणि बायणा पावर हाऊस या तीन प्रकल्पांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुरगाव: विद्यमान पालिका मंडळाची मुदत संपण्यास एक महिना शिल्लक असताना मुरगाव पालिकेने चौदाव्या वित्त आयोगाचे २३ कोटी रुपये वास्को मासळी मार्केट, पालिका इमारत नुतनीकरण आणि बायणा पावर हाऊस या तीन प्रकल्पांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेकडे चौदाव्या वित्त आयोगाचे ३३ कोटी रुपये वापराविना पडून आहे.

मुरगाव पालिकेच्या विद्यमान मंडळाने आपल्या ५९ महिन्यांच्या कालावधीत विकास प्रकल्प उभारण्याच्या अनेक घोषणा केल्या होत्या. पण, एकही प्रकल्प साकार झाला नाही. सिग्नेचर प्रकल्प आठ वर्षे शितपेटीत खितपत पडून आहे. वास्को मासळी मार्केट असू दे किंवा पालिका इमारतीचे नूतनीकरण यालाही मुहूर्त मिळत नाही. वाहनतळ, बायणा मासळी मार्केट, पावर हाऊस हे प्रकल्प हवेत तरंगत आहेत. 

तथापि, आता कालावधी संपण्यास एक महिना शिल्लक असताना चौदाव्या वित्त आयोगाचे पैसे वापरून तीन प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहे.

२३ कोटी रुपये या तीन प्रकल्पांवर पालिका खर्च करणार आहे.पालिका मंडळातील सर्व २५ नगरसेवकांकडून या प्रकल्पासाठी मान्यता घेण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या