मोरजी किनारी वादळी वाऱ्याचा तडाखा

निवृत्ती शिरोडकर
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

वादळी वाऱ्याने आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे मोरजी आश्वे- मांद्रे किनारी भागात तडाखा बसला आहे. त्यात किनारी भागाची धूप तर झालीच शिवाय पारंपरिक मच्छीमार व्यावसायिकांच्या झोपड्या होड्या यांना धोका निर्माण झाला.

मोरजी

वादळी वाऱ्याने आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे मोरजी आश्वे- मांद्रे किनारी भागात तडाखा बसला आहे. त्यात किनारी भागाची धूप तर झालीच शिवाय पारंपरिक मच्छीमार व्यावसायिकांच्या झोपड्या होड्या यांना धोका निर्माण झाला. लाखो रुपये किमतीची जाळी वाहून गेली.
या भागात व्यावसायिकांना जेटी व होड्या जाळी ठेवण्यासाठी शेड बांधावी, अशी गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकांची मागणी आहे . मात्र या मागणीचा अजूनपर्यंत पाठपुरावा झालेला नाही. त्याबद्दल व्यावसायिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. समुद्रावर ज्यांचे जीवन अवलंबून असलेल्या काबीज खारवी समाजाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. या व्यवसायात आता इतर समाजाचे नागरिक उतरत असल्याने पारंपरिक पद्धतीने मासे मारी करून आपले जीवन जगणाऱ्या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.
सरकारच्या मच्छीमार खात्याने या किनारी भागाला भेट देऊन पारंपरिक व्यावसायिकांच्या झोपड्या. होड्या, त्यांच्या जाळी सामानाची स्थिती काय आहे. झोपड्यापर्यंत पोचत असलेले समुद्राचे पाणी प्रत्यक्ष भरतीच्या वेळी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून करावी, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे. मोरजी पंचायत क्षेत्रात, विठ्ठलदास वाडा, टेंबवाडा या भागात मोठ्या प्रमाणात खारवी समाज कार्यरत आहे. त्यांच्या पारंपरिक होड्या व जाळ्या ठेवण्यासाठी पारंपरिक झोपड्यांना निसर्गाचा धोका निर्माण तर होतोच शिवाय या व्यवसायाला स्पर्धेचा सामना करत असतानाच दुसऱ्या समाजातील नागरिक आधुनिक यंत्राचा वापर करून मच्छीमारी करत असतात आणि आता पर्यटन व्यवसायाने हा मासेमारी व्यवसाय धोक्यात आणला आहे.

GOA GOA GOA

संबंधित बातम्या