Morjim Land Issue: मोरजी डोंगर-माळरानावरील जमिनी परप्रांतीयांच्‍या घशात!

ऑर्चड जमिनींचे सेटलमेंट झोनमध्ये रुपांतर करण्‍याचे प्रकार वाढले
Amit Morje
Amit MorjeGomantak Digital Team

Morjim Land Issue: मोरज पंचायत क्षेत्रातील डोंगर माळरानावर असलेली एकूण 60 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त ऑर्चड विभागाखाली येत असलेली जमीन सेटलमेंट झोनमध्ये रुपांतर करण्याच्‍या प्रक्रियेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

या डोंगर माळरानावरील अनेक जमिनी अभियंते, चित्रपट निर्माते, क्रिकेटपटू, उद्योजक, राजकारण्‍यांचे नातेवाईक आदी लोकांनी विकत घेतली आहे.

तेथे फार्महाऊसच्या नावाखाली इमारती उभारण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या सर्व प्रकारांना राजकारणी, स्थानिक पंचायती आणि सरकारचाही आशीर्वाद असल्‍याची बाब आता लपून राहिलेली नाही.

Amit Morje
Morjim Power Outage : विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण; वीजप्रवाह सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघाडच

मोरजी परिसरातील हजारो चौरस मीटर ऑर्चड जमिनी विकत घेऊन तिचे रुपांतर करण्‍याचे प्रकार सुरू आहेत. त्‍यात काजू बागायती जमिनींचा मोठा समावेश आहे. या जमिनी सेटलमेंट झोनमध्ये घालण्याचा डाव खेळला जातोय.

स्थानिकांकडे पैसा, जमिनी परप्रांतीयांकडे

एक काळ असा होता डोंगर माळरानावरील सर्व जमिनी स्थानिकांच्या हातात होत्या, परंतु पैसा नव्हता. मात्र आता परिस्‍थिती उलट आहे. स्थानिकांकडे कोट्यवधी रुपये आले, मात्र जमिनी बिगरगोमंतकीयांच्‍या हातात गेल्‍या. जमिनी विकणारे आहेत म्हणून जमिनी घेणारे आहेत. शिवाय जमिनी दाखवणारे दलालही तेवढेच आहेत.

Amit Morje
Morjim Gramsabha: रस्ता खुला न झाल्यास पुढील घटनेस सरकार जबाबदार; मोरजी ग्रामस्थांचा इशारा

जमीन देणारे, घेणारे, दाखवणारेही करोडपती

आज प्रत्येकाला पैसा हवा आहे. मोरजी पंचायत क्षेत्रातील अनेक जमिनी बिगरगोमंतकीयांना विकण्यासाठी दलालांची मोठी स्‍पर्धा सुरू आहे. जमिनी विकणारे, जमिनी घेणारे आणि जमीन विकण्यासाठी मध्यस्थी दलाली करणारेसुद्धा आज करोडपती झालेले आहेत. त्यांना प्रत्येक चौरसमागे मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते. जमीन देणारा आणि जमीन विकत घेणाऱ्याकडूनही त्याला कमिशन मिळते. त्यातून दलालही करोडपती बनले आहेत. दिसून येते.

Amit Morje
Morjim Water Shortage Issue: पाण्यासाठी 3-4 किमी पायपीट, स्मार्ट गोव्यातील भीषण चित्र

ऑर्चर्ड, कृषी, पर्यावरण संवेदनशील भागांचे बिल्डर लॉबीकडून सेटलमेंट झोनमध्ये रुपांतर करणे गोव्यातील लोकांसाठी विनाशकारी ठरणार आहे. टीसीपी कायदा दुरुस्ती 17 (2) स्क्रॅप करण्यासाठी दबाव आणला पाहिजे. तसेच ग्रामसभांमध्‍ये टीसीपी कायदा दुरुस्ती 17 (2) स्क्रॅप करण्यासाठी ठराव मांडला पाहिजे. तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल.

- अमित मोरजे, मोरजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com