Goa: धारगळमध्ये त्वरित उड्डाणपूल उभारा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Morjim: दोन खांब परिसरात अत्यावश्यक असलेल्या उड्डाणपूलाची त्वरित उभारणी करावी.
Dhargal People
Dhargal PeopleDainik Gomantak

Morjim: राष्ट्रीय महामार्ग 66 वरील धारगळ येथील दोन खांब परिसरात अत्यावश्यक असलेल्या उड्डाणपूलाची त्वरित उभारणी करावी, अन्यथा पूर्ण गावाला घेऊन रस्त्यावर येण्याचा इशारा धारगळ पंचायत मंडळ नागरिकांनी दिला आहे.

धारगळ पंचायत क्षेत्रातील दोन खांब या ठिकाणी अत्यावश्यक असलेल्या उड्डाणपुलाचा आराखडा नियोजन रस्त्यात होता. परंतु तो अचानक रद्द करून आता या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. उड्डाणपूल असताना तो कोणी रद्द केला याची चौकशी व्हावी. आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या ठिकाणी त्वरित नवीन उड्डाणपूल उभारण्यासाठी सरकारने आश्वासन दिले, तरच आम्ही सरकारच्या बाजूने राहणार आहोत. नाहीतर पूर्ण गावाला घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

Dhargal People
गोव्यात शेतीकामासाठी होणार 'Drone' तंत्रज्ञानाचा वापर!

यावेळी सरपंच अनिकेत साळगावकर, पंच सतीश धुमाळ, सिद्धेश धारगळकर, रोहिदास हरमलकर, जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर, न्हानु हरमलकर, साधू कानोळकर, महेश साळगावकर, सागर नाईक सम्राट सोयरोजी, नारायण साळगावकर दिलीप वीर, मयूर नाईक, दर्शना शेट्ये आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी धारगळ सरपंच अनिकेत साळगावकर म्हणाले, ‘आमदार प्रवीण पार्लेकर यांच्यासोबत पंचायत मंडळ आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहोत. उड्डाणपुलाविषयी आम्ही चर्चा करून हा प्रश्न कायमचा सोडवला जाईल.’ तर धारगळ पंचायत क्षेत्रातील दोन खांबाजवळ उड्डाणपूलाची अत्यावश्यक गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग तयार करणाऱ्या अभियंत्याने तशा प्रकारचा नियोजन केले होते.

Dhargal People
Sonali Phogat Case : सोनाली हत्या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवणार

परंतु उड्डाणपूल अचानक रद्द का करण्यात आला याची माहिती आजपर्यंत ग्रामस्थांना किंवा पंचायतीला दिलेली नाही. सरकारने या ठिकाणी त्वरित उड्डाणपूल उभारून होणारी गैरसोय आणि धोके टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर यांनी केली.

रस्ता शोधावा कसा?

धारगळ या ठिकाणी रस्ता क्रॉस करण्यासाठी कोणतेच उड्डाणपूल नाही. किंवा शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेती नांगरणीसाठी अवजारे जनावरे घेऊन जाण्यासाठी कुठून रस्ता शोधावा, असा गंभीर प्रश्न आहे. शिवाय एखाद्या धारगळ येथून किंवा तुये मार्गे धारगळ येऊन प्रवासी बसला जर थेट म्हापशाला जायचे असेल तर त्याला अगोदर धारगळ सुकेकुळण अशा चार किलोमीटरच्या दूर ठिकाणी जाऊन पुन्हा मार्गे धारगळ येऊन म्हापसा जावे लागेल त्यासाठी सरकारने उड्डाणपूल उभारावे अशी मागणी केली.

Dhargal People
Goa पोलिसांकडून फोंड्यात 'हॅकेथन' स्पर्धा

राष्ट्रीय महामार्ग 66 चे रुंदीकरण आणि काम करत असताना पूर्वी ज्या ज्या गावांमधून जोडणारे सर्व्हिस रस्ते आहेत. ते रस्ते अगोदर करावेत अशी मागणी वारंवार स्थानिक आणि स्थानिक आमदार निवडून आलेल्यांनीही केली. परंतु कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि मनमानी कारभारामुळे सर्विस रस्ते आजही काही ठिकाणी केले गेले नाही. त्यामुळे पूर्णपणे सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालकांना याच राष्ट्रीय महामार्गावर अवलंबून राहात लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com