Mormugao: मुरगाव पालिका आदेशाला केराची टोपली; विक्रेत्यांकडून रस्त्यावरील अतिक्रमण कायम

नागरिकांनी दाद मागावी कोणाकडे ?
encroachment
encroachmentDainik Gomantak

वास्को: भाजी मार्केटमधील रस्त्यावर अतिक्रमणे सहन केली जाणार नाहीत, असा आदेश मुरगाव पालिकेने दिला होता. या आदेशाला भाजी विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवत अतिक्रमणे जैसे थे ठेवली आहेत. यावर नागरीकांनी मुरगाव पालिका अधिकारी कारवाई करत नसल्याने विक्रेत्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे म्हटले आहे.

(Mormugao Citizens demand removal of encroachments of vegetable vendors )

वास्को नागरिक आता मुरगाव विक्रेत्यांपुढे हतबल झाले आहेत. तसेच पालिकेकडून कारवाईची अपेक्षा करीत नसल्याचे उपरोधाने नागरीक म्हणत आहेत. सध्या भाजी मार्केटमधील भाजी, फळे, तसेच विविध वस्तूंची विक्री करणाऱ्यांनी रस्ता गिळंकृत केला आहे. त्यांना अधिकाऱ्यांची भीती उरली नसल्याने त्यांच्यावर वरदहस्त आहे कोणाचा? याची चर्चा परिसरात रंगली आहे.

encroachment
Vasco Accident News: चुकीच्या बाजूने बेदकारपणे गाडी चालवून एका महिलेचा मृत्यू

अतिक्रमण करताना विक्रेते दुकानात माल मांडण्याऐवजी दुकानासमोरच्या रस्त्यावर 'क्रेट्स' ठेवून त्यावर मालांची विक्री करतात. तसेच वास्को रेल्वे स्थानकासमोर काही विक्रेते हातगाड्यांवर रस्सा, ऑम्लेट पाव, चहा, भजी असे अन्न पदार्थ विकतात. या पदपथावर अतिक्रमण केल्याने आता पदपथही त्यांनी ताब्यात घेत अतिक्रमण केले आहे.

encroachment
Mapusa: दुचाकी चोरी प्रकरणात मयडेतील दोघांना अटक

...ती कारवाई एका दिवसाची ठरली

विक्रेत्यांना वास्को पोलिसांनीही समज देत तेथून हटविले होते. त्यांचे साहित्य दुकानांमध्ये मांडण्यास सांगितले होते. याप्रकरणी वास्कोवासीयांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु ही कारवाई एका दिवसाची ठरली.

त्यानंतर त्या विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमणे करून मालविक्री सुरू केली आहे. त्यांच्या विरोधात अद्याप कारवाई होत नसल्याने ग्राहक मुरगाव पालिकेच्या नावाने बोटे मोडीत आहेत. परंतु मुरगाव पालिका थातूरमातूर कारणे देत वेळ मारून नेत आहे. त्यामुळे नागरीकांनी दाद मागावी कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com