‘मुरगावचा सुवर्ण महोत्सवी प्रकल्प बनला भंगारअड्डा’

प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सरकारने पुढाकार घेण्याचा काँग्रेसची मागणी
‘मुरगावचा सुवर्ण महोत्सवी प्रकल्प बनला भंगारअड्डा’
Mormugao Golden Jubilee ProjectDainik Gomantak

वास्को : स्व. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पायाभरणी केलेल्या मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकारी बंगल्याच्या जागी ''सुवर्ण महोत्सवी प्रकल्प'' रखडल्याने भंगार अड्ड्याबरोबर कचरा प्रकल्प होत चालला आहे. राज्य सरकारने स्व.पर्रीकर यांच्या हस्ते पायाभरणी झालेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी केली आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे गेली दहा वर्षे हा प्रकल्प उभा होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Mormugao Golden Jubilee Project
महिलेवर हल्लाप्रकरणी माय-लेकीला जामीन

मुख्यमंत्री दिगंबर कामत सरकारच्या कार्यकाळात सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील सर्व पालिकांना कोटी रुपयांचा निधी पालिका उभारण्यासाठी देण्यात आला होता. याच उद्दिष्टाने वास्को येथील मुरगाव पालिकेने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या जागी व्यावसायिक इमारत उभारणीसाठी २७ जुलै २०१३ रोजी पायाभरणी केली होती. मात्र दहा वर्षे पूर्ण होत आली तरीही प्रकल्प उभा राहिलेला नाही. नगरविकास मंत्री, पालिका संचालकांनी मुरगाव पालिकेच्या सुवर्णमहोत्सवी प्रकल्प पूर्तीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी खान यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com