Mormugao Port: 30 सप्टेंबर पासून समुद्र पर्यटन हंगामाला सुरुवात

जहाज पर्यटन हंगामाबरोबर ग्रीन कार्गोला प्राधान्य
Mormugao Port
Mormugao PortDainik Gomantak

वास्को: मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या हार्बर क्रूज बंदरावर समुद्र पर्यटन हंगामाला 30 सप्टेंबर 2022 ते 5 मे 2023 पर्यंत सुरुवात होणार आहे. बंदरातील जहाज पर्यटन हंगामाबरोबर बंदरातील हिरवा माल (ग्रीन कार्गोला) प्राधान्य देणार आहे. गोव्यात खाण व्यवसाय सुरू झाल्यास मुरगाव पत्तन प्राधिकरणाने आपली तयारी सुरू ठेवली असल्याची माहिती मुरगाव पत्तन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.वेंकट रमण अक्कराजू यांनी दिली.

(Mormugao Harbor Cruise Port Sea tourism season starts from September 30 2022)

मुरगाव बंदर प्राधिकरणाचे चेअरमन व्यंकटा रमणा अक्कराजू यांनी या हंगामासाठी क्रूझ लाइनर्सच्या आगमनाची योजना आखण्यासाठी भागधारकांसोबत बैठक घेतली. या बैठकीला क्रूझ लाइनर्सचे ऑपरेटर, सुरक्षा एजन्सी आणि एमपीए अधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये 30 सप्टेंबर रोजी बंदराला भेट देणाऱ्या पहिल्या क्रूझ लाइनरचे जल्लोषात स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुरगाव सडा येथील मुरगाव पत्तन प्राधिकरणातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती अध्यक्ष डॉ. वेंकट रमण अक्कराजू यांनी दिली. येत्या 30 सप्टेंबरपासून समुद्र पर्यटन हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी हार्बर येथील क्रूजेटीवर देशी विदेशी पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सर्व ती तयारी प्राधिकरणाने केली आहे. यंदा समुद्र पर्यटन हंगामात 15 विदेशी जहाजे युरोप राष्ट्रातून येणार आहेत. यात 35 देशांतर्गत पर्यटक जहाजे हार्बर क्रुझ जेटीवर येणार असल्याची माहिती पत्रकार परिषेतून अध्यक्ष डॉ. अक्कराजू यांनी दिली.

समुद्र पर्यटन हंगामामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल अशी माहिती अध्यक्ष डॉ. अक्कराजू यांनी दिली. मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक नऊ, दहा, अकरावर भविष्यात हिरवा माल (ग्रीन कार्गो) आणण्यासाठी बंदर प्रशासनाने पर्यंत्त सुरू केली असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अक्कराजू यांनी दिली.

Mormugao Port
Goa Politics: पक्षांतरावर सुदिन ढवळीकर म्हणतात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’

गोवा सरकारने यंदा खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जर राज्यात खाण व्यवसाय सुरू झाल्यास मुरगाव पत्तन प्राधिकरणातर्फे सर्व तयारी खाण निर्यात करण्यासाठी ठेवली असल्याची माहिती त्यांनी दिली. मुरगाव बंदराबरोबर हार्बर क्रूझ जेटीवर स्थानिक युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार असल्याची माहिती डॉ. अक्कराजू यांनी दिली.

Mormugao Port
MGPचे माजी आमदार लवू मामलेदार करणार TMC मध्ये प्रवेश

मुरगाव पत्तन प्राधिकरणाचे सडा येथील दीपविहार शैक्षणिक संस्था व हॉस्पिटल सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत देणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. व्यंकट रमण अक्कराजू यांनी दिली. सार्वजनिक खाजगी भागीदारी केल्यास यांचा विद्यार्थी शिक्षक पालकांबरोबर मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या निवृत्त कामगार किंवा सध्या असलेल्या कामगार वर्गाला कोणताही आरोग्याविषयी प्रश्न भेडसावणार नसल्याची माहिती डॉ. अक्कराजू यांनी दिली.

सडा येथील मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या इस्पितळासमोर असलेला मुरगाव नगरपालिकेचा फक्त कचरा खाली (डम्पयार्ड) करण्याचा असल्याने येथील इस्पितळातील रुग्णांना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतो, यासाठी स्थानिक पालिकेने पुढाकार घेऊन कचऱ्यावर नियंत्रण आणावे अशी मागणी अध्यक्ष डॉ. अक्कराजू यांनी शेवटी दिली.

मुरगाव नगरपालिका सडा येथील कचरा टाकणारी जागा फक्त डम्पयार्ड असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून मुरगाव पत्तन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. व्यंकट रमण अक्कराजू यांनी देऊन एका प्रकारे अज्ञानासारखे भाष्य केले असल्याची माहिती मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी यांनी दिली.

सडा येथील मुरगाव नगरपालिकेचा वैज्ञानिक कचरा प्रकल्प असून यांनी सर्वप्रथम माहिती मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्याकडून घेणे महत्त्वाचे होते. उगाच प्रसार माध्यमांसमोर येऊन मुरगाव पालिकेचा कचरा टाकणारी जागा असे संबोधून राज्यात मुरगाव नगरपालिकेचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी केले आहे. राज्यात मुरगाव नगरपालिकेचा सडा येथील वैज्ञानिक कचरा प्रकल्प असून टाकाऊ वस्तु पासून खत व इतर गरजेच्या वस्तू तयार होतात. अशी माहिती मुख्याधिकारी जयंत तारी यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com