Mormugao Municipality: संपूर्ण गोव्यात ‘अ’ दर्जाची पालिका असूनही तिजोरी रिकामीच

मुरगाव पालिकेची थकबाकी वसुली होत नसल्याने पुन्हा खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे पगाराविना पुन्हा हाल होत आहेत.
Mormugao Municipality
Mormugao MunicipalityDainik Gomantak

Mormugao Municipality: मुरगाव पालिकेची थकबाकी वसुली होत नसल्याने पुन्हा खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे पगाराविना पुन्हा हाल होत आहेत. गेल्या महिन्याचा पगार अजून न जमा झाल्यामुळे पुन्हा पोटापाण्याचा प्रश्न उद्‍भवल्याने कर्मचारी चिंतेत पडले आहेत. पालिका तिजोरीत पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांना किमान दोन महिने वेतन मिळणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुरगाव पालिका म्हणजे संपूर्ण गोव्यात ‘अ’ दर्जाची पालिका म्हणून गणली जाते. मात्र, वारंवार पालिकेला कर्मचाऱ्यांचा पगार अदा करण्यास कसरत करावी लागते. पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याने पालिकेचा दर्जा घसरत आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे दुकान भाडे तसेच विविध करांच्या थकबाकीची वसुली करण्यास पालिका अपयशी ठरली आहे. मुरगाव पालिकेची वास्को शहरात व जवळपासच्या भागात भाडेपट्टीवर हजाराहून अधिक दुकाने आहेत.

Mormugao Municipality
Goa Health: गोवा सरकार 270 कोटी रुपये खर्च करून कर्करोगावरील हॉस्पिटल बांधणार ?

यात कित्येक दुकाने अवैध आहेत, जी भाडे भरतच नाहीत. तसेच 100 हून अधिक आस्थापने आहेत. या सर्व दुकान व आस्थापनांपैकी बहुतेकजण पालिकेला भाडे देत नाहीत. तसेच पालिका त्यांना विचारत नाही, असाच प्रकार सध्या घडत आहे.

मुरगाव पालिकेला अनेक वर्षांपासून थकबाकी येणे बाकी आहे. त्यामुळे याचा परिणाम पालिका कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो. थकबाकी वसुली होत नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही, अशी सबब मुख्याधिकारी देतात. तसेच ऐन सणासुदीत कर्मचाऱ्यांना पगाराविना दिवस काढावे लागतात.

Mormugao Municipality
Goa News: खैरीच्या झाडांची तस्करी; एकाला धारबांदोडात अटक

पालिका कर्मचाऱ्यांचा गेल्या महिन्याचा पगार अजून न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. कित्येक कर्मचारी कर्जबाजारी असल्याने बँकांनी हप्ता वसुलीसाठी तगादा लावला आहे. तसेच मुलांची शालेय फी, घरभाडे, वीज, पाणी आदींची बिले कशी फेडायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

मुख्याधिकाऱ्यांना विचारले तर पालिकेकडे पैसे नाहीत, असे कारण पुढे केले जाते. महिन्याची 1 तारीख आली की बँका कर्जफेडीसाठी या कामगारांकडे तगादा लावतात. त्यांना कसे उत्तर द्यायचे हा मोठा प्रश्‍न कर्मचाऱ्यांना पडत आहे. तेव्हा तातडीने पगार द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com