मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

बँकांचा कर्ज वसूलीसाठी तगादा
Mormugao Palika employees
Mormugao Palika employeesDainik Gomantak

मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन खात्यात अजून जमा न झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांना घेराव घालून जाब विचारला असता पालिकेकडे पैसे नसल्याने वेतन रखडले असल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. पण कोणत्याही परिस्थितीत बॅंक कर्ज घेऊन वेतन देऊ असे आश्वासन मुख्याधिकारी जयंत तारी यांनी दिल्यानंतर कर्मचारी माघारी फिरले.

मुरगाव (Mormugao) पालिका कर्मचाऱ्यांची पगाराविना अधोगती चालू होत असून गेल्या महिन्याचे वेतन अजून खात्यात जमा न झाल्याने पालिका कर्मचारी विवंचनेत पडले आहेत. हप्ता वसुलीसाठी बँकांनी तगादा लावल्याने कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत.

Mormugao Palika employees
सोशल मीडियाचा गोव्यातील मतदारांवर प्रभाव?

' अ' दर्जाची मुरगाव नगरपालिका नानाविध कारणाने प्रसिद्धीच्या झोकात असून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही हा एक प्रमुख प्रश्न आहे. पालिकेला करोडो रुपयांची थकबाकी येणे आहे, मात्र वसुली व्यवस्थित होत नसल्याने तसेच पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन देणे पालिकेला डोईजड होत आहे. प्रत्येक महिन्याला पालिका कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न उद्भवत असल्याने कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. प्रत्येक कर्मचारी कर्जबाजारी असल्याने वेतन वेळेवर खात्यात जमा होत नसल्याने बँक हप्ता वसुलीसाठी तगादा लावतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.

तसेच त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित राहतो. त्यामुळे काय करावे काय नाही याच विवंचनेत कर्मचारीवर्ग वावरत आहे. डिसेंबर महीन्याच्या 22 तारखेला पालिका कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन दिले होते. मात्र आज फेब्रुवारी महिन्याची 16 तारीख झाली तरी वेतन खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅंकानी कर्ज वसूलीसाठी तगादा लावला आहे.

Mormugao Palika employees
सरकारी अधिकार्‍यांविरुद्ध काँग्रेसची निर्वाचन अधिकाऱ्यांकडे तक्रार

दरम्यान, आज पालिका कर्मचाऱ्यांनी (employees) पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांना घेराव घालून जाब विचारली असता पालिका तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असल्याचे तारी यांनी सांगितले.तसेच सरकार कडून येणारा ऑक्ट्राय गेली सात वर्षे बंद झाला असल्याने पालिकेवर सदर परीस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच विधानसभा निवडणुकी काळात थकबाकी वसूली केली नसल्याने वेतन देण्यास विलंब झाला असल्याचेही ते म्हणाले.तेव्हा आता राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज काढून वेतन खात्यात जमा केले जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी जयंत तारी यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिले.

दरम्यान गोवा पालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस वासूदेव धावडे यांना याविषयी विचारले असता पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यात वेळेवर जमा होत नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांवर संक्रांत आली आहे. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कर्मचारी कर्ज बाजारी असून हप्ता वसूलीसाठी बॅंक तगादा लावत आहे. या व्यातिरीक्त निवृत्त कर्मचारी अजूनही पेन्शन पासून वंचित आहे.त्यामुळे आपल्या मुलांच्या लग्न कार्यासाठी पैशांची चणचण भासत असल्याने आडकाठी येत आहे. कष्टाचे पैसे मिळत नसतील तर जायच कूठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण विवंचनेत आहे.

गोवा (goa) पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता पालिकेची थकबाकी वसूली झाली नसल्याने आर्थिक चणचण पालिकेला आहे. याला जबाबदार पालिका प्रशासन आहे. यावर प्रशासनाने योग्य तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. याचे खापर पालिका कर्मचाऱ्यांवर फोडू नये. जर दोन दिवसात वेतनाचा प्रश्न सूटला नाहीतर कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरवू असा इशारा प्रभू यांनी यावेळी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com