मुरगाव तालुका ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 248 अर्ज ग्राह्य

34 उमेदवारी अर्ज ठरले अवैध
MORMUGAO News
MORMUGAO NewsDainik Gomantak

वास्को: मुरगाव तालुका ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सातही पंचायतीतून आलेल्या 282 अर्जा पैकी 248 अर्ज ग्राह्य तर 34 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामूळे उमेदवारांसाठी तयारी करण्यासाठी आवश्यक असलेले चित्र आता अधिक - अधिक स्पष्ट होत जाणार आहे. (mormugao taluka village panchayat election: 248 applications accepted and 34 invalid)

MORMUGAO News
Jet Patcher: दक्षिण गोव्यात आणखी दोन 'जेट पॅचर' मशीन

राज्यात 1० ऑगष्ट रोजी होणान्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुरगाव तालुक्यातील कासावली, वेळसाव, केळशी, चिखली, चिकोळणा, कुठ्ठाळी व सांकवाळ या सातही पंचायतीसाठी एकूण 282 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यात सर्वाधिक उमदेवाही अर्ज सांकवाळ पंचायतीत, त्यापाठोपाठ चिखली पंचायतीत दाखल झाले होते.

दरम्यान आज झालेल्या अर्ज छाननीतून मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीतील 282 उमेदवारी अर्जांपैकी ज्यांनी दोनवेळा अर्ज सादर केले होते असे 34 अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर आता एकूण अर्ज संख्या 248 ग्राह्य धरण्यात आले आहे.

MORMUGAO News
माजाळी तपासणी नाक्यावर 90 हजारांचे स्पिरिट जप्त

दरम्यान मुरगाव तालूक्यातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज सांकवाळ पंचायतीत ७1 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ चिखली पंचायत (48 अर्ज), कुठ्ठाळी (32 अर्ज), वेलसांव (21 अर्ज), केळशी (2० अर्ज), कासावली (3७ अर्ज) व चिकोळणा (1९ अर्ज) दाखल करण्यात आले जे ग्राहय धरण्यात आले आहे. उद्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती जण माघार घेणार आहेत यावर आता किती उमेदवार एकमेकांसमोर भिडणार आहे ते कळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com