Moscow-Goa Bomb Threat : ‘दाबोळी’वर खळबळ; उतरणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कॉल

मॉस्कोहून दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या रशियन चार्टर विमानात बॉम्ब असल्याची माहिती सोमवारी रात्री उशिरा गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाली.
Moscow-Goa Bomb Threat
Moscow-Goa Bomb ThreatDainik Gomantak

Moscow Goa Flight: मॉस्कोहून दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या रशियन चार्टर विमानात बॉम्ब असल्याची माहिती सोमवारी रात्री उशिरा गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाली. यानंतर 244 प्रवाशी असलेले हे विमान तातडीने जामनगर-गुजरात विमानतळाकडे वळवण्यात आले. तिथे रात्री 9.49 वाजता विमानाचे सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले.

सध्या हे विमान आयसोलेशनमध्ये असून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. या बॉम्बच्या धमकीमुळे दाबोळी विमानतळावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. (Moscow-Goa Bomb Threat)

Moscow-Goa Bomb Threat
Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्‍नी अधिवेशनात 19 जानेवारीला चर्चा; वाढीव कालावधी नाहीच

मिळालेल्या माहितीनुसार, मॉस्कोहून गोव्याला उड्डाण करणारे रशियन हवाई कंपनी अझूर एअरच्या विमानात स्फोटक बॉम्ब असल्याचा एक फोन पोलिसांना आला. त्याचवेळी गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोल याच आशयाचा एक मेल प्राप्त झाला. यानंतर हायअलर्ट जारी करून विमानाच्या पायलटला सूचित करण्यात आले.

दाबोळीवर उतरणारे हे विमान तातडीनं गुजरातच्या जामनगर विमानतळावर उतरविण्यात आले. तोपर्यंत जामनगरचे सर्व उच्च अधिकारी विमानतळावर पोहोचले होते. फ्लाइटमध्ये अनेक परदेशी प्रवाशी होते.

भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही या संपूर्ण घटनेला दुजोरा दिला आहे. जामनगर येथील प्रशासकीय अधिकारी, पोलिस यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, विमानाची तपासणी सुरू आहे. सध्या जामनगर विमानतळाच्या आत बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

जामनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांसह अधिकारी विमानतळावर रात्री उशिरापर्यंत होते.

Moscow-Goa Bomb Threat
Moscow-Goa फ्लाईटमधील प्रवाशांचे हाल, विमानतळावरील व्हिडिओ आला समोर

‘दाबोळी’वर खळबळ

गोवा पोलिस देखील या घटनेमुळे सतर्क झाले असून, दाबोळी विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल नेमका कुठून आला? कुणी केला याची चौकशी केली जात आहे.

रात्री उशिरा पोलिसांची उच्च बैठक सुरू झाली होती. बॉम्बची माहिती मिळताच दाबोळी विमानतळावर बॉम्बशोधक पथक तसेच अग्निशमन दलाचे पथक तत्काळ पोहोचले. याशिवाय सीआयएसएफचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक देखील हजर झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com