Crime: फोंडा तालुक्यात सर्वाधिक चोऱ्यांच्या घटना

16 पोलिस स्थानके : दक्षिण गोव्यात गत वर्षी 235 प्रकरणे; 67 % चोऱ्यांचा तपास
Crime
Crime Dainik Gomantak

दक्षिण गोव्यातील नवीन व्यावसायिक केंद्र म्हणून पुढे येणाऱ्या फोंडा परिसरात आर्थिक उलाढाली वाढण्याबरोबर चोऱ्यांचेही प्रमाण वाढू लागले आहे. दक्षिण गोव्यात एकूण १६ पोलिस स्थानकांच्या हद्दीत २०२२मध्ये एकूण २३५ चोऱ्यांची नोंद झाली असून, पोलिसांनी १५९ चोऱ्यांचा तपास लावला आहे. तपासाची टक्केवारी ६७ एवढी आहे.

मागच्या वर्षभरात या पोलिस स्थानकाच्या हद्दीत तब्बल ४३ चोऱ्यांची नोंद झाली असून दक्षिण गोव्यातील एकूण चोऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण १८ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर औद्योगिक क्षेत्र म्हणून मान्यता मिळविलेल्या वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ३६ चोऱ्या झाल्या असून एकूण चोऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण १५ टक्के आहे. तर तिसरा क्रमांक मडगावचे विकसित होणारे उपनगर असलेल्या फातोर्डा पोलिस स्थानकाचा लागत असून मागच्या वर्षभरात या पोलिस स्थानकाच्या हद्दीत २२ चोऱ्यांची नोंद झाली असून हे ९ टक्के आहे. या तिन्ही पोलिस स्थानकांवरील चोऱ्यांची एकूण टक्केवारी ४२ टक्के एवढी होते.

Crime
Kalasa- Mahadayi River: ‘कळसा’मुळे म्हादईच्या उपनद्यांवर परिणाम

मुंबईच्या टोळीचे टार्गेट ‘फोंडा’

मागच्या वर्षी मुंबईच्या एका टोळीने फोंडा शहराला टार्गेट केल्याने या शहरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते, अशी माहिती फोंडा शहराचे तत्कालीन उपअधीक्षक सी. एल. पाटील यांनी दिली. ही टोळी सायन मुंबई येथील होती. रात्री मोटरसायकलवरून फोंड्यात येऊन बंद घरे आणि बंगले हेरून ते फोडत असत. पोलिसांनी नंतर त्यांना सापळा रचून पकडले. मागच्या वर्षी फोंड्यात एकूण ११ (सहा दिवसा व पाच रात्री) चोऱ्या झाल्या; पण त्यापैकी १० घरफोड्यांचा तपास पोलिसांनी लावला, असे त्यांनी सांगितले.

Crime
Goa Temperature: कडाका वाढला! पणजीत सलग तीन दिवस पारा 20C च्या खाली

कमी चोऱ्यांची नोंद

मायणा-कुडतरी (१९), केपे व कुडचडे (१४) येथे चोऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. दक्षिण गोव्यात सहा पोलिस स्थानकांत सर्वात कमी चोऱ्यांची नोंद झाली असून त्यात विमानतळ (३), वास्को रेल्वे, सांगे, कुळे व मुरगाव (प्रत्येकी ६) व काणकोण (७) यांचा यामध्ये समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com