COVID-19 Goa: या केंद्रांवर सर्वाधिक कोविड रूग्णांची नोंद

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

केंद्रवार सर्वाधिक कोविड रूग्ण
मडगाव 2837,  कांदोळी 1765, पर्वरी 100, कुठ्ठाळी 1286 ,  फोंडा  1834 , पणजी 1786, म्हापसा  1572  , वास्को  1058,   चिंबल  1267,  शिवोली 1123, साखळी  1279, पेडणे 1300.

पणजी : नव्या कोरोनाबाधितांची(Covid-19) संख्या कमी व्हावी, कोरोनामुळे होणारे मृत्यू घटावेत, यासाठी सरकारने(Goa) कडक कर्फ्यू(curfew) लावलेला आहे. मात्र हे सर्व प्रयत्न विफल होऊन राज्यात कोरोनाबळींचा कहर सुरुच असून प्राणवायूचा योग्य पुरवठा न झाल्याने 24 तासांत 26 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.(Most covid patients at Madgaon Vasco Porvorim Ponda Mapusa Panaji Center)

काल तब्बल 75 व्यक्ती कोरोनाच्या बळी पडल्या असून गेल्या 11 दिवसात कोरोनाने 636 जणांचे प्राण घेतले आहेत. एकीकडे सरकारी पक्षाचे आमदार बाबूश मोन्सेरात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य खाते अपयशी ठरल्याचा आरोप करून आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे खुद्द आरोग्यमंत्री संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत.  या सर्व गोंधळात कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास अडचणी येऊन कोरोना बळींची संख्या बेसुमार वाढत आहे.

Goa Medical College: ऑक्सिजनच्या कमतरतेमूळे 26 रुग्णांचा मृत्यू 

राज्यात कोरोना हाताबाहेर गेलाय

आज दिवसभरात 8505 कोविड तपासणीसाठी स्वॅब तपासण्यात आले. त्यात 3124 नवे कोरोना संसर्गित सापडले तर 2475 कोरोनाबाधित बरे झाले. आज आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वात जास्त 75 कोरोनाबाधितांचे निधन झाले. सलग  पंधराव्या दिवशी दोन हजारपेक्षा जास्त कोरोना बाधित सापडले आहेत. गेल्या 11 दिवसांत 33,722 कोरोना बाधित सापडले असून या 11 दिवसांत तब्बल 636 व्यक्तींना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यावरून राज्यात कोरोना हाताबाहेर गेलाय हे स्पष्ट झाले आहे. आणि त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण असून विरोधकांनी सरकारवर असंवेदनशील झाल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारने कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करतानाच कर्फ्यू ही लावला आहे. जे नियम तोडतात त्यांच्यावर कठोर कारवाई होत आहे.  तरीही कोरोना नियंत्रणात येत नाही. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात कोरोनावर उपचार घेणाऱ्या 75 व्यक्तींचे निधन झाले. त्यामुळे आतापर्यंत राज्यामध्ये कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींची संख्या 1804 वर पोचली आहे. काल दिवसभरामध्ये 2475 कोरोनाबाधित बरे झाले. आजच्या दिवशी राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 32836 वर पोचली असून कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी 70 टक्के पेक्षा खाली पोचली आहे.

COVID-19 Goa: इव्हर्मेक्टिन कोविडमध्ये किती प्रभावी

केंद्रवार सर्वाधिक कोविड रूग्ण
मडगाव 2837,  कांदोळी 1765, पर्वरी 100, कुठ्ठाळी 1286 ,  फोंडा  1834 , पणजी 1786, म्हापसा  1572  , वास्को  1058,   चिंबल  1267,  शिवोली 1123, साखळी  1279, पेडणे 1300.
 

संबंधित बातम्या