Goa Illegal Shop: गोव्यात मोठ्या संख्येने अवैध मद्य दुकाने

Liquor Shop: राज्यात मोठ्या संख्येने अवैध मद्य दुकाने असून अबकारी खात्याने या प्रकाराकडे काणाडोळा केला आहे
Liquor Shop
Liquor ShopDainik Gomantak

Liquor Shop: राज्यात मोठ्या संख्येने अवैध मद्य दुकाने (illegal Liquor Shop) असून अबकारी खात्याने या प्रकाराकडे काणाडोळा केला आहे. अबकारी खात्याकडून मद्य परवाना मिळवण्यासाठी 25 वर्षीय रहिवासी दाखला असणे आवश्‍यक असल्याने सहसा हे परवाने बिगर गोमंतकीयांना मिळत नाहीत. तसेच मद्य दुकाने भाडेपट्टीवरही देता येत नाहीत, परंतु हा प्रकार खुलेआम सुरू आहे आणि अबकारी खात्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, असा दावा अखिल गोवा मद्यमालक संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी केला आहे.

आज राज्यातील किनारपट्टी भागात मोठ्या संख्येने मद्य दुकाने भाडेपट्टीवर देण्याचे प्रकार घडत आहेत. इतर राज्यांतून येणारे व्यक्ती हे दोन ते तीन वर्षांसाठी दुकाने भाडेपट्टीवर चालवतात आणि नंतर निघून जातात. त्यांच्याकडून सरकारला कोणत्याही प्रकारचे कर मिळत नसल्याने त्यांना नफा होतो, परंतु भविष्यात हा प्रकार अबकारी खात्याच्या अंगाशी येणार असल्याचा इशारा नाईक यांनी दिला. कांदोळी, कळंगुट, कोलवासारख्या परिसरात मोठ्या संख्येने मद्य दुकाने भाडेपट्टीवर दिल्याचे आढळले आहे, असे नाईक म्हणाले.

Liquor Shop
Skin Care Tips| बिअर ठरते त्वचेसाठी उत्तम गुणकारी, जाणून घ्या कसा कराल वापर

अबकारी खात्याच्या एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर हे मान्य केले की मद्य दुकाने भाडेपट्टीवर देण्याचे प्रकार घडत आहेत, परंतु दुकानावर आम्ही चौकशी केल्यास आपण दुकानाचा व्यवस्थापक असल्याचे उत्तर ती व्यक्ती देते. त्यासाठी गोमंतकीयांनी स्वतःहून हा प्रकार थांबवला पाहिजे. जेव्हा परवाना दिला जातो, तेव्हा भाडेपट्टीवर न देण्याचे त्यात स्पष्ट केलेले असते, असे अधिकारी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com