गोव्यात गोंधळ झाला कसा? खाजगी हॉस्पिटलने मृतांची माहिती लपविली?

Hospital
Hospital

मडगाव: खासगी इस्पितळांनी(Hospital) कोविड(Covid-19 Death) मृतांची माहिती सरकारपासून(Goa Government) लपवून ठेवली यात कुठलेही तथ्य नसून जो गोंधळ निर्माण झाला आहे तो सरकारच्याच अनागोंदी कारभारामुळे, असा खुलासा मडगाव(Margaon) येथील मदर केअर(Mother Care Hospital) या इस्पितळाचे प्रमुख डॉ. अमन प्रभुगावकर यांनी केला आहे.(Mother Care Hospital in Goa hides information about the dead)

मदर केअर इस्पितळाने 22 कोविड मृतांची माहिती लपवून ठेवली अशी माहिती सरकारी सूत्रांनीच उघड केली होती. मात्र, ती वस्तुस्थिती नाही. ही माहिती पाठविण्यासाठी जी मुदत आम्हाला दिली होती. त्याहून फक्त सात दिवस ही माहिती उशिरा पाठविण्यात आली एव्हढेच, असे ते म्हणाले.

डॉ. प्रभुगावकर म्हणाले, कुठल्याही इस्पितळात कुणाचेही निधन झाले, तर ती माहिती लपवून ठेऊ शकतच नाही. तो रुग्ण कसा मृत झाला त्याची माहिती मृत्यू अहवालात द्यावी लागते. मृत्यू दाखला घेण्यासाठी ही माहिती नगरपालिकेत द्यावी लागते. कोविडच्या काळात ज्या इस्पितळात कोविड रुग्णांवर उपचार केले जात होते, त्या इस्पितळातून दिवसाला तीन वेळा भरती झालेले रुग्ण, डिस्चार्ज दिलेले रुग्ण आणि मृत पावलेले रुग्ण यांची माहिती आरोग्य खात्याला पुरविण्यात येत होती. या इस्पितळात सरकारने आपले देखरेख अधिकारी नियुक्त केले होते. असे असतानाही ही माहिती लपवून ठेवली हे कसे होऊ शकते, असा सवाल त्यांनी केला. 

हा गोंधळ कसा झाला याबद्दल माहिती देताना डॉ. प्रभुगावकर म्हणाले, सरकारने आमच्याकडे ही माहिती एक्सेल शीटवर मागितली होती. १७ वेगवेगळ्या रकान्यातून त्यांना ही माहिती हवी होती. मात्र, कोविडच्या काळात वैद्यकीय वगळता इतर बहुतेक कर्मचाऱ्यांनी कामावर येणे बंद केले होते. त्यामुळे सर्व माहिती संकलीत करून ती विहित नमुन्यात भरून आरोग्य खात्याकडे पाठविण्यात आम्हाला एक आठवडा जास्त लागला. कोविडचा ताण असताना आणि कर्मचारी कमी असल्याने अशी दिरंगाई होणे स्वाभाविक आहे. वास्तविक सरकारने जे देखरेख अधिकारी इस्पितळात नेमले होते. त्यांच्याकडूनही ही माहिती हवी असल्यास सरकार घेऊ शकले, असते असे ते म्हणाले. नाही

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com