Margao News: मडगाव रेल्वे स्टेशनवर आईनेच दोन मुलींना सोडलं

'त्या' दोन्ही अल्पवयीन मुलींना पोलिसांकडून संरक्षण
Railway Police
Railway PoliceDainik Gomantak

मडगाव: वास्को येथे एका चिमुरडीचा आईनेच गळा घोटळ्याची घटना ताजी असताना मडगाव रेल्वे स्टेशनवर एका आईनेच आपल्या दोन मुलींना सोडून देऊन स्वतः निघून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

(mother left the two daughters at Margao railway station)

Railway Police
Goa Forward Party च्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई न्यायालयाकडून रद्द

या दोन्ही मुलींचे नाव सोनाली मोरी (15) आणि गोपी मोरी (7) अशी असून मडगाव रेल्वे स्थानकावर घाबरलेल्या अवस्थेत फिरताना पोलिसांना आढळून आल्या. "पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्या दोघी आई बरोबर स्टेशनवर आल्या होत्या. पण आई त्यांना तिथेच सोडून गेली अशी माहिती त्यांना मिळाली. सध्या या मुलींना अपना घरामध्ये ठेवण्यात आले आहे.

Railway Police
Sugar TurDal scam: प्रकरणी मंत्र्यांनी हात झटकले

दाभोळी येथील चिमुरडीचा जन्मदात्रीनेच घोटला गळा काय नेमके प्रकरण ?

वास्को: आज सकाळी चिखली दाबोळी येथे एका 14 महिन्यांच्या चिमुरडीची तिच्या आईनेच घरात हत्या केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपी आईने मूलीची हत्या केली व यानंतर झुआरी पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या जवळच असलेल्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीला वाचवले व पोलिसांच्या स्वाधीन केले. सद्या शयित आरोपी आईवर गोमेकॉत उपचार चालू आहे.

चिखली दाबोळी येथे 14 महिन्यांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दाबोळी चिखली परिसरात शनिवारी घटना घडली आहे. संशयित आई निमीषा गोनी (वाल्सन) (वय 38 ) हिने आपल्या 14 महिन्यांच्या मुलीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com