Mother's Day 2023 : मातृत्वाचा सन्मान होणे काळाची गरज
म्हापसा : स्वकष्टातून मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या मातांचा सन्मान होणे काळाची गरज आहे. तिच्या सन्मानार्थ साजरा होणारा मातृत्व दिन सर्वत्र साजरे व्हायला हवेत, असे प्रतिपादन साळगाव सरपंच लुकास रेमेडिओस यांनी केले.
साळगाव पंचायत सभागृहात आयोजिलेल्या ‘मदर्स डे’, कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसरपंचा उत्कर्षा संदेश कुडणेकर, पंच रामदास कोनाडकर, अनिल परुळेकर, दयानंद कुडणेकर, मारिया, प्रदीप पाडगांवकर, श्री कमळेश्वर उच्च माध्यमिकचे अध्यापक विठोबा बगळी, प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.
सरपंच लुकास म्हणाले, समाजात निस्वार्थी भावनेने कार्य करणाऱ्या युवकांची गरज आहे. प्रदीप सावंत सारखे युवक आज समाजाभिमुख कार्य करित आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
प्रदीप पाडगांवकर म्हणाले, आईचा महिमा अगाध आहे. पौराणिक काळात सुद्धा माता आपल्या मुलांच्या कल्याणाचा ध्यास घेऊन वावरत होती.आईचे महात्म्य टिकून ठेवण्याची गरज आहे.तिचा सन्मान जा समाजाचा सन्मान आहे.
यावेळी माता भगिनींच्या हस्ते केक कापून मातृत्व दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवडक मातांना प्रत्येकी एक हजार रुपये देऊन मान्यवारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रदीप सावंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
वडिलधाऱ्यांचा सन्मान करा!
विठोबा बगळी म्हणाले, गोव्यात प्रथमच साळगाव सारख्या पंचायतीत मदर्स डे साजरा होतो ही समाधानाची आणि अभिमामाची गोष्ट आहे.वृद्धश्रमाच्या जमान्यात वयोवृद्ध माणसांना सन्मानाबरोबर मुलांच्या आधाराची गरज आहे. तसेच या वडिलधाऱ्यांचा सन्मान ते सोबत असतानाच करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.