गोव्यातील 'पर्यटन' आंदोलनाने वेधले जगाचे लक्ष

पर्यावरणाचा मुद्दा: हजारो लोकांचा रेल्वे रुळावर तब्बल पाच तास ठिय्या
गोव्यातील 'पर्यटन' आंदोलनाने वेधले जगाचे लक्ष
Movement in GoaDainik Gomantak

मडगाव: 1 नोव्हेंबर 2020 या तारखेला गोव्यातील पर्यटन लढ्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. कारण ‘गोयांत कोळसो नाका’ या बावट्याखाली त्या रात्री हजारोंच्या संख्येत आंदोलक चांदर येथे येऊ लागले होते. रात्र वाढत जात होती तशी आंदोलकांची संख्याही वाढत होती. ही संख्या 5 हजारांवर पोहोचली. त्यांची एकच मागणी होती, रेल्वे मार्ग दुपदरीकरण नको.

या हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांनी चक्क रेल्वे रुळावर ठाण मांडून तिथे मेणबत्त्या पेटविल्या. यावेळी काही जणांनी तर गाणी म्हणत आंदोलकांना स्फूर्ती आणण्याचे काम केले. चक्क पाच तास ते या रेल्वे रुळावर बसले होते. त्यांचा एकच ध्यास आणि उद्देश होता की गोव्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणारे हे दुपदरीकरण कोणत्याही प्रकारे बंद करायचेच. याच आंदोलनाने खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाचे लक्ष या तीन रेखीय प्रकल्पाना केल्या जाणाऱ्या विरोधाकडे ओढले गेले. त्यामुळेच केंद्रीय उच्चाधिकार समितीला या प्रश्नात लक्ष घालावे लागले. त्यातूनच त्यांनी पश्चिम घाट परिसरात हा रस्ता करण्यास विरोध दर्शविला आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्या शिफारसी मानून घेतल्या.

Movement in Goa
'हौशी' बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचा एथनला ब्राँझपदक

‘त्या दिवशी आम्ही काय सांगत होतो तेच खरे असल्याचे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले’, अशी प्रतिक्रिया या आंदोलनातील प्रमुख नेते कॅप्टन विरियातो फेर्नांडिस यांनी व्यक्त केली. ‘भाजप सरकार विकासाचा मुद्दा पुढे करून हे तिन्ही प्रकल्प पुढे रेटू पाहत होते आणि आम्ही हा विकास सर्वसामान्य गोवेकारांचा नसून केवळ काही कंपन्यांचा आहे, असे घसा ओरडून सांगत होतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे जे आम्ही सांगत होतो त्यावर आजच्या निर्णयाने शिक्कामोर्तब केले.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आज न्यायालयाने या लोकभावनेची कदर केली आहे. गोवा सरकारने त्याची दखल घेऊन केंद्राला हे तिन्ही प्रकल्प रद्द करण्यासाठी भाग पाडावे अशी मागणी केली. हे तिन्ही प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही असे यांनी ओलेंसीओ सिमोईस सांगितले. न्यायालयाचा निकाल म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी गोवा सांभाळून ठेवण्यासाठी जे लोक रस्त्यावर उतरले होते, त्या सर्वांचा विजय अशी प्रतिक्रिया या आंदोलनातील नेते आणि तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.जॉर्सन फेर्नांडिस यांनी व्यक्त केली.

Movement in Goa
केंद्राला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; गोव्यातील जनआंदोलनाचा विजय

लोकभावनेचे अनोखे प्रदर्शन

या आंदोलनाचा प्रभाव एवढा होता, की काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या सासष्टीच्या आमदारांना सरकारच्या इच्छेविरुद्ध जाऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा लागला. ते आंदोलन म्हणजे लोकभावनेचे एक अनोखे प्रदर्शन होते अशी प्रतिक्रिया या आंदोलनातील आणखी एक नेते ओलेंसीओ सिमोईस यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.