राज्यात रेल्वे दुपदरीकरण आंदोलन चांगलंच पेटण्याची शक्यता!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

 या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण कोळसा वाहतुकीसाठी केले जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे असून त्यासाठीच त्यांचा या मार्गाला तीव्र विरोध आहे.

पणजी- रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी राज्यात आंदोलन तीव्र होत आहे. रविवारी रात्री दहा वाजता चांदोर- दक्षिण गोवा येथे मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन या दुपदरीकरणाला विरोध करणार असल्याचा, इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गोव्यातील सासष्टी तसेच अन्य तालुक्यांमधील ख्रिस्ती बांधवांनी रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला विरोध करत हा विषय चांगलाच तीव्र केला आहे. 

 या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण कोळसा वाहतुकीसाठी केले जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे असून त्यासाठीच त्यांचा या मार्गाला तीव्र विरोध आहे. या दुपदरीकरणाचा मार्ग कामी लागल्यावर राज्यातील कोळशाची मोठ्या प्रमाणावर कर्नाटकात वाहतूक केली जाणार असल्याने येथील पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम होतील, याची भीती येथील लोकांना असून म्हणूनच यासाठी आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. २ नोव्हेंबर रोजी चांदोर व गिर्दोली लेव्हल क्रॉसिं बंद ठेवून काम केले जाणार असल्याने तेथे मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.  

संबंधित बातम्या