Mavin Gudinho : राज्यातील सर्वात मोठ्या पंचायत घराच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ होणार : मावीन गुदिन्हो

पंचायत घर सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार
Mavin Gudinho
Mavin GudinhoDainik Gomantak

Mavin Gudinho : सांकवाळ पंचायत घराच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. पंचायत घर हे सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल तसेच हे राज्यातील सर्वात मोठे पंचायत घर असेल असे पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी सांगितले.

झुआरीनगर येथे जिल्हा पंचायत निधीतून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनानंतर मंत्री गुदिन्हो बोलत होते. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, सांकवाळ उपसरपंच गिरीष पिल्ले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Mavin Gudinho
Mahadayi Water Dispute: अमित शहांच्या वक्तव्यावर विरोधक आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सांकवाळ पंचायत घरासंबंधी काही सोपस्कार राहिले आहेत, ते पूर्ण झाल्यावर लगेच पंचायत घराची पायाभरणी करण्यात येईल. सदर पंचायत घर राज्यातील एक आदर्श उदाहरण असेल. ज्याचे अनुकरण राज्यातील इतर पंचायती करू शकतात, असे मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

सदर पंचायत घर बांधण्यासाठी सरकारतर्फे सुमारे साडेतीन कोटी रुपये देण्यात येतील. उर्वरित खर्च सांकवाळ पंचायत करणार आहे. या पंचायत घरामध्ये एक परिषद खोली, बैठक खोली, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग इत्यादीसाठी खोल्या असतील यातून पंचायतीला महसूल मिळेल असे ते म्हणाले.

Mavin Gudinho
Mahadayi Water Dispute: अमित शहांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण, म्हादईच्या...

जिल्हा पंचायत निधीतून सदर सार्वजनिक शौचालये बांधण्यात आल्याबद्दल आमदार वाझ यांनी अनिता थोरात यांचे कौतुक केले. स्थानिकांची गैरसोय दूर होणार आहे. मात्र, त्यांनी सदर शौचालयाची योग्य ती देखभाल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

सरकार साडेतीन कोटी खर्च करणार असून, पंचायत सुमारे दहा कोटी खर्च करणार असल्याचे उपसरपंच पिल्ले यांनी सांगितले. नवीन पंचायत घरासंबंधी काहीजणांनी निरनिराळ्या समस्या मांडल्या. येणाऱ्या काळात आम्ही या स्वप्नपूर्ती प्रकल्पाची पध्दतशीरपणे पायाभरणी करणार असल्याचे ते म्हणाले.

ग्रामस्थांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे. त्यांनी ओला व सुका असे वर्गीकरण केलेला कचरा दिल्यास कचरा प्रश्न मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होईल, असे उपसरपंच पिल्ले यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com