Verna IDC: वेर्णा औद्योगिक वसाहतीत एमएसएमई इन्क्युबेशन पार्क; उद्योग विकासाचा उद्देश

गोवा ‘आयडीसी’च्या उद्योग प्रतिनिधींच्या तिमाही बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा
Verna IDC
Verna IDCDainik Gomantak

Verna IDC: गोवा औद्योगिक विकास महामंडळ (आयडीसी)च्या वतीने शुक्रवारी (ता.१९) पहिली तिमाही आढावा बैठक झाली. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), भारतीय वाणिज्य आणि उद्योग चेंबर महासंघ (फिक्की), असोचॅम (असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया) आणि लघु उद्योग भारती यांच्यासह उद्योग संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चार बैठका आयोजित केल्या जात आहेत.

Verna IDC
Goa Krishi Mahotsav: शेतकरी कृषी विधेयकासोबत; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास

गोवा आयडीसीच्या संचालक मंडळावर प्रतिनिधित्व नसलेल्या औद्योगिक संस्थांकडूनही औद्योगिक वसाहतीमधील सेवासुविधा तसेच उद्योग विकासासाठीच्या त्यांच्या अपेक्षा, अनुभव, मते प्राप्त करण्याच्या उद्देशाने या बैठकांचे आयोजन केले जात आहे.

या सल्लाबैठकांमध्ये गोवा आयडीसीच्या वतीने राबवण्यात येत असलेले धोरण, योजना, उपक्रम तसेच पाठपुरावा करण्यात येत असलेल्या समस्या, प्रश्न याबाबतचा सविस्तर अहवालही उद्योग संस्थांसमोर मांडला जात आहे. या अहवालाबाबत योग्य दिशा, अंमलबजावणी करण्याबाबत उद्योग संस्थांकडून प्राप्त सूचना, शिफारशीही गोवा आयडीसीच्या मंडळासमोर सादर केल्या जाणार आहेत.

तिमाही सल्लाबैठकांचे आयोजन करण्यामागे गोवा आयडीसीच्या मंडळावर प्रतिनिधित्व नसलेल्या उद्योग संस्थांकडूनही उद्योग विकास व साधनसुविधांबाबत अनुभव, अपेक्षा व मते समजून घेण्याचा उद्देश आहे. राज्यामध्ये अनुकूल, उत्साहवर्धक व्यवसाय वातावरण निर्मिती करण्याच्या कामी सर्वच उद्योग संस्थांसमवेत सक्रिय सहकार्य, सहभाग मिळवण्याचा आमचा उद्देश आहे.

- प्रविमल अभिषेक, व्यवस्थापकीय संचालक, गोवा आयडीसी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com