मुकेश कुमार मीणा आज घेणार  पोलिस महासंचालकाचा ताबा 

mukesh kumar
mukesh kumar

पणजी

गोव्याचे नवे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा हे आज गोव्यात दाखल झाले आहेत. उद्या ३ जुलैला सकाळच्या सत्रात पोलिसांकडून सलामी स्वीकारल्यानंतर ते पदाचा ताबा घेणार आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांची मिझोराम येथून थेट गोव्यात बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी गोवा पोलिस सेवेत काम केले आहे. 
महासंचालक मुकेश कुमार मीणा हे १९८८ ॲग्मूट केडरमधील आयपीएस पोलिस अधिकारी आहेत. दिल्लीत असताना त्यांच्याकडे क्राईम ब्रँचचा पोलिस आयुक्ताचा ताबा होता. त्यांनी दिल्लीतील सरकारच्या घोटाळ्यांच्या तपासकामावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. आज २ जुलैला दुपारी पत्नीसह दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. उद्या सकाळच्या सत्रात पोलिस मुख्यालयात त्यांना पोलिसांकडून सलामी दिली जाणार आहे. 
गोव्याचे माजी पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांचे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आकस्मिक निधन झाल्यानंतर हे पद गेले सात महिन्याहून अधिक काळ रिक्त होते. महानिरीक्षक जसपाल सिंग यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला होता.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com