Ponda News: ‘मुक्तिधाम’चा कायापालट होणार

आजपासून नूतनीकरण ः फोंड्यात रवी नाईक यांच्या हस्ते शुभारंभ
Ponda News
Ponda NewsDainik Gomantak

फोंडा पालिकेच्या वारखंडे येथील मुक्तिधाम स्मशानभूमीची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम रविवारी 19 रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे. फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते या कामाला सुरुवात होणार आहे.

यावेळी फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना डांगी, तसेच नगरसेवक वीरेंद्र ढवळीकर, प्रदीप नाईक, यतिश सावकर, सीमा फर्नांडिस, चंद्रकला नाईक, शांताराम कोलवेकर, व्यंकटेश नाईक, जया सावंत, विलियम आगियार, अमिना नाईक, विश्‍वनाथ दळवी, आनंद नाईक व गिताली तळावलीकर आदींसह फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी सोहन उस्कैकर व मुख्य अभियंता दीपक देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.

नगरपालिकेच्या स्मशानभूमीला आता नवा साज चढणार आहे. याकरता जवळजवळ सव्वा कोटी रुपये खर्च येणार असल्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.

ही स्मशानभूमी रवी नाईक उपमुख्यमंत्री असताना अस्तित्वात आली होती. खासदार भाजपचे रमाकांत आंगले होते. पण त्यानंतर गेली 22 वर्षे या स्मशानभूमीकडे तसे दुर्लक्षच झाले. त्यामुळे प्रेताचे दहन करताना येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

पावसाळ्यात लिकेज होत असल्यामुळे भिजत भिजत दहन करावे लागत आहे. रितेश नाईक यांनी नगराध्यक्ष पदाचा ताबा घेतल्यावर या स्मशान भूमीचे नूतनीकरण करण्याचे ठरविले.

येत्या महिन्यात नगरपालिका निवडणूक असल्यामुळे या स्मशानभूमीचे पूर्णत्व नव्या नगरपालिका मंडळाच्या कारकिर्दीत होईल. रवी नाईक हेच आमदार असल्यामुळे ते हे काम तडीस लावतील, असे मत नागरिकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

Ponda News
Sanjeev Verekar: संजीव वेरेकर यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार

अद्ययावत स्मशानभूमी!

आता नवे पत्रे टाकण्यात येणार असून वॉशरूम तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय स्मशानात येणाऱ्या करता बसण्याची व्यवस्था करण्याची सोयही या नव्या प्रकल्पात असणार आहे. प्रेताचे दहन करण्याकरता नवीन व्यवस्थाही या नवीन प्रकल्पात करण्यात आली असून त्यामुळे ही स्मशानभूमी अद्ययावत होणार आहे. हा प्रकल्प येत्या सहा सात महिन्यात कार्यान्वित होईल, असे नगराध्यक्ष रितेशनी सांगितले.

बाजारालाही नवा रंग : सध्या नगराध्यक्ष रितेशनी फोंड्यात विकासाभिमुख कामाचा झपाटा लावला असून फोंडा बाजारातील मासळी बाजारालाही नवा रंग देण्याच्या दृष्टीने तसेच गेली बारा वर्षे खितपत पडलेल्या सुवर्ण महोत्सवी प्रकल्पाला संजीवनी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com