
Mumbai Goa Highway Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई- गोवा महामार्गाची सिंगल लेन सुरू केली जाईल असे ठोस आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मंगळवारी सर्वत्र लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे.
गणपती आगमन काही तासांवर येऊन ठेपले असताना खरचं महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे का? सध्या कोकणात येणारे प्रवासी याबाबत काय बोलत आहेत, हे या वृत्तातून जाणून घेऊया.
गणेशोत्सवासाठी रोजगारानिमित्त विविध ठिकाणी असलेले चाकरमानी कोकणात दाखल व्हायला लागले आहेत. मागील दोन दिवसांपासून मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे वृत्त समोर येत आहेत. तर, महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी महामार्गाची अवस्था आणि सिंगल लेनाच्या कामाबाबत संताप व्यक्त करत आहेत.
रवींद्र चव्हाण हे छायाचित्र निरखुन पहा. बोलले त्याप्रमाणे खरच जर सिंगल लेन पुर्ण झाली किंवा "मोटरेबल" झाली असेल तर सर्व वाहने उजव्या बाजुच्या लेनवर का आहेत.? मुंबईकडून गोव्याकडे जाणारी लेन तर डावीकडे आहे. अजून किती पुरावे हवेत रविंद्र चव्हाणांच्या खोटारडेपणाचे ?
"मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीने श्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या खोट्या दाव्यांची पोल खोल केली.आतातरी खोटारडे मंत्री राजीनामा देतील का ??" असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन सुरु होईल असे आश्वासन दिले होते पण, ते खोटे ठरले आहे. खुला करण्यात आलेला कशेडी घाट बोगद्याचे काम अद्याप सुरु आहे. असे ठाण्यातून कोकणात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने म्हटले आहे. घरी पोहचण्यासाठी पंधरा तास वेळ लागला असेही या प्रवाशाने सांगितले.
दरम्यान, महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असून, महामार्गाची अवस्था देखील बिकट असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. सिंगल लेनचे आश्वसान पूर्ण न केल्याने मंत्री चव्हाण राजीनामा देतील असा प्रश्न मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.